फिफा विश्वचषक 2026 : गोल्डन बूटच्या शर्यतीत एम्बाप्पे आघाडीवर तर मेस्सी दुसऱ्या स्थानावर
नवी दिल्ली, 10 जुलै (हिं.स.)। फिफा विश्वचषक 2026 आता निर्णायक टप्प्यात पोहोचला आहे. फ्रान्सने मोरोक्कोचा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. यासह स्पर्धेतील सर्वाधिक गोल करणाऱ्या खेळाडूला दिल्या जाणाऱ्या गोल्डन बूटच्या शर्यतीलाही अधिक रंग चढल
Sports Football FIFA WC Golden Boot Mbappe


नवी दिल्ली, 10 जुलै (हिं.स.)। फिफा विश्वचषक 2026 आता निर्णायक टप्प्यात पोहोचला आहे. फ्रान्सने मोरोक्कोचा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. यासह स्पर्धेतील सर्वाधिक गोल करणाऱ्या खेळाडूला दिल्या जाणाऱ्या गोल्डन बूटच्या शर्यतीलाही अधिक रंग चढला आहे. फ्रान्सचा स्टार स्ट्रायकर किलियन एम्बाप्पे 8 गोल आणि 3 असिस्टसह अव्वल स्थानावर कायम आहे.

अर्जेंटिनाचा कर्णधार लिओनेल मेस्सी यानेही 8 गोल केले आहेत, मात्र त्याच्या नावावर केवळ 1 असिस्ट असल्याने तो दुसऱ्या स्थानावर आहे. नॉर्वेचा एर्लिंग हालांड 7 गोलांसह तिसऱ्या स्थानावर आहे. इंग्लंडचा हॅरी केन 6 गोल आणि 1 असिस्टसह चौथ्या स्थानावर आहे, तर फ्रान्सचा उस्मान डेम्बेले 5 गोल आणि 2 असिस्टसह पाचव्या स्थानावर कायम आहे.

याशिवाय सेनेगलचा इस्माइला सार, स्पेनचा मिकेल ओयारजाबाल, मेक्सिकोचा ज्युलियन क्विनोनेस, इंग्लंडचा जूड बेलिंगहॅम आणि ब्राझीलचा विनिसियस ज्युनियर यांनी प्रत्येकी 4 गोल केले आहेत. या सर्व खेळाडूंच्या नावावर प्रत्येकी 1 असिस्टही नोंदवण्यात आली आहे. त्यामुळे उपांत्यपूर्व फेरीनंतर गोल्डन बूटची ही लढत आणखी रंजक बनली आहे.

फिफाच्या नियमांनुसार, दोन किंवा अधिक खेळाडूंनी समान संख्या गोल केल्यास प्रथम असिस्टच्या संख्येच्या आधारे आणि त्यानंतर मैदानावर खेळलेल्या कमी मिनिटांच्या आधारे विजेत्याचा निर्णय घेतला जाईल. उपांत्यपूर्व फेरीतील सामन्यांसह गोल्डन बूटची ही शर्यत आणखी रोमांचक झाली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande