नाशिकमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का मिळणार, १० ते १२ नगरसेवक शिंदे सेनेच्या संपर्कात?
नाशिक, 10 जुलै (हिं.स.)। : राज्याच्या राजकारणात पक्षांतराच्या चर्चांना पुन्हा एकदा वेग आला असून, ठाकरे गटासाठी नाशिकमधून मोठी राजकीय घडामोड समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. काही आमदार उद्धव ठाकरे यांची साथ सोडणार असल्याच्या चर्चांदरम्यान
नाशिकमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का मिळणार, १० ते १२ नगरसेवक शिंदे सेनेच्या संपर्कात?


नाशिक, 10 जुलै (हिं.स.)।

: राज्याच्या राजकारणात पक्षांतराच्या चर्चांना पुन्हा एकदा वेग आला असून, ठाकरे गटासाठी नाशिकमधून मोठी राजकीय घडामोड समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. काही आमदार उद्धव ठाकरे यांची साथ सोडणार असल्याच्या चर्चांदरम्यान आता नाशिक महानगरपालिकेतील ठाकरे गटाचे नगरसेवक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या संपर्कात असल्याची माहिती समोर येत आहे.राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या चर्चेनुसार, ठाकरे गटाचे सुमारे १० ते १२ नगरसेवक लवकरच शिंदे सेनेत प्रवेश करू शकतात. या संदर्भात शिंदे गटातील वरिष्ठ नेत्यांसोबत संबंधित नगरसेवकांची बैठक झाल्याचेही सांगितले जात आहे. मात्र, या वृत्ताला अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी मिळालेली नाही.या संभाव्य पक्षप्रवेशाच्या पार्श्वभूमीवर 'ऑपरेशन टायगर'चीही जोरदार चर्चा सुरू झाली आहे. या अंतर्गत पक्षात प्रवेश करणाऱ्या नगरसेवकांच्या प्रभागांसाठी प्रत्येकी 5 कोटी रुपयांचा विशेष विकास निधी उपलब्ध करून दिला जाणार असल्याचा दावा केला जात आहे. मात्र, याबाबत शासन किंवा शिवसेनेकडून अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेली नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास आणि विकासकामांमुळे अनेक लोकप्रतिनिधी स्वेच्छेने शिवसेनेत प्रवेश करण्यास इच्छुक असल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, ठाकरे गटाचे मनापा गटनेते केशव पोरजे यांनी आमचे सर्व नगरसेवक माताेश्रीशी एकनिष्ठ असल्याचे सांगितले. शिंदे गटाकडून याबाबत राजकारण केले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande