अमरावती: शहानूर योजनेचा पाणीपुरवठा उद्यापासून तीन दिवस बंद
अमरावती, 10 जुलै (हिं.स.)।महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अमरावती जलव्यवस्थापन विभागांतर्गत शहानूर धरणावरील तांत्रिक दुरुस्तीच्या कामामुळे शहानूर धरण पाणीपुरवठा योजनेतून सुरू असलेल्या दोन महत्त्वाच्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांचा पुरवठा ११ ते १३ जु
शहानूर योजनेचा पाणीपुरवठा उद्यापासून  ३ दिवस बंद


अमरावती, 10 जुलै (हिं.स.)।महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अमरावती जलव्यवस्थापन विभागांतर्गत शहानूर धरणावरील तांत्रिक दुरुस्तीच्या कामामुळे शहानूर धरण पाणीपुरवठा योजनेतून सुरू असलेल्या दोन महत्त्वाच्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांचा पुरवठा ११ ते १३ जुलै या कालावधीत सलग तीन दिवस पूर्णपणे बंद राहणार आहे. ही माहिती महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता विवेक सोळंके यांनी दिली. शहानूर मध्यम प्रकल्पावरील वीजनिर्मिती व्यवस्था पूर्ववत सुरू करण्यासाठी तसेच मुख्य प्रवेश झडप (मेन इनलेट व्हॉल्व्ह) दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. हे काम तांत्रिकदृष्ट्या अत्यावश्यक असल्याने या कालावधीत प्रकल्पातून होणारा संपूर्ण पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. या दुरुस्तीमुळे शहानूर धरणावर अवलंबून असलेल्या १५६ गावे आणि दोन शहरांच्या सामूहिक पाणीपुरवठा योजनांवर परिणाम होणार आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांना तीन दिवस पाणीपुरवठा मिळणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने नागरिकांना आवश्यकतेनुसार पिण्याच्या पाण्याचा साठा करून ठेवण्याचे तसेच उपलब्ध पाण्याचा काटकसरीने आणि जपून वापर करण्याचे आवाहन केले आहे.

------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande