झुकरबर्ग यांचे एक्सवर पुनरागमन; मेटाचे ‘म्यूज स्पार्क 1.1’ एआय मॉडेल लाँच
मुंबई, 10 जुलै (हिं.स.)। मेटाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकरबर्ग यांनी तीन वर्षांहून अधिक काळानंतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पुनरागमन करत कंपनीच्या नव्या कृत्रिम बुद्धिमत्ता मॉडेलची घोषणा केली आहे. मेटाने ‘म्यूज स्पार्क 1.1’ हे अत्याधुनिक
Zuckerberg Returns X Meta Launches ‘Muse Spark 1.1’ AI Model


मुंबई, 10 जुलै (हिं.स.)। मेटाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकरबर्ग यांनी तीन वर्षांहून अधिक काळानंतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पुनरागमन करत कंपनीच्या नव्या कृत्रिम बुद्धिमत्ता मॉडेलची घोषणा केली आहे. मेटाने ‘म्यूज स्पार्क 1.1’ हे अत्याधुनिक एआय मॉडेल लाँच केले असून, या माध्यमातून कंपनीने ओपनएआय आणि अँथ्रोपिक यांसारख्या एआय क्षेत्रातील मोठ्या कंपन्यांना आव्हान देण्याची तयारी सुरू केली आहे.

झुकरबर्ग यांनी सांगितले की, ‘म्यूज स्पार्क 1.1’ हे कमी खर्चात उपलब्ध होणारे शक्तिशाली एजंटिक आणि कोडिंग मॉडेल आहे. हे मॉडेल मेटाच्या नवीन मॉडेल एपीआय आणि मेटा एआय सेवेमध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहे. या मॉडेलची विशेष क्षमता म्हणजे ते टूल वापर, कॉम्प्युटर वापर आणि एजंटिक कामगिरीमध्ये अधिक प्रभावीपणे काम करू शकते.

म्यूज स्पार्क 1.1 मध्ये 10 लाख टोकन कॉन्टेक्स्ट विंडो देण्यात आली आहे. त्यामुळे हे मॉडेल मोठ्या प्रमाणातील माहिती, कोड किंवा दस्तऐवज एकाच वेळी समजून घेऊन त्यावर प्रक्रिया करू शकते. हे मॉडेल अनेक सब-एजंट्सना काम सोपवून जटिल कामे पूर्ण करण्यास सक्षम आहे. तसेच डेस्कटॉप, मोबाईल आणि ब्राउझरवरील संगणकीय प्रणाली समजून घेण्यासाठी याला प्रशिक्षण देण्यात आले आहे. मेटाच्या मते, हे मॉडेल कोड लिहिणे, कोडमधील चुका शोधणे, सॉफ्टवेअर साधनांशी संवाद साधणे आणि अनेक टप्प्यांतील कामे कमी मानवी हस्तक्षेपात पूर्ण करण्यास सक्षम आहे. हे मजकूर, प्रतिमा आणि व्हिडिओ समजून घेऊन अधिक प्रगत स्वरूपाची कामे करू शकते.

हे मॉडेल मेटाच्या सुपरइंटेलिजन्स लॅब्सने विकसित केले आहे. यापूर्वी कंपनीने म्यूज स्पार्कचे पहिले मॉडेल सादर केले होते. आता नवीन आवृत्तीच्या माध्यमातून मेटाने पेड एआय मॉडेल एपीआय बाजारपेठेत प्रवेश केला आहे.मेटा मॉडेल एपीआयसाठी नोंदणी करणाऱ्या विकासकांना सुरुवातीला 20 डॉलरचे मोफत क्रेडिट दिले जाणार आहे. त्यानंतर वापरानुसार शुल्क आकारले जाईल. मेटाने प्रति दशलक्ष इनपुट टोकनसाठी 1.25 डॉलर आणि आउटपुट टोकनसाठी 4.25 डॉलर अशी किंमत निश्चित केली आहे.

सध्या म्यूज स्पार्क 1.1 हे मेटा एआय ऍप आणि वेबसाइटवरील ‘थिंकिंग मोड’मध्ये उपलब्ध होत आहे. भविष्यात हे मॉडेल व्हॉट्सऍप, इंस्टाग्राम, फेसबुक आणि मेटाच्या एआय स्मार्ट ग्लासेसमधील सध्याच्या ल्लामा मॉडेल्सची जागा घेऊ शकते.

एजंटिक मॉडेल म्हणजे असे एआय तंत्रज्ञान जे केवळ प्रश्नांची उत्तरे देत नाही, तर स्वतः निर्णय घेऊन साधनांचा वापर करत काम पूर्ण करू शकते. तर टोकन कॉन्टेक्स्ट विंडो म्हणजे एआयची एका वेळी मोठ्या प्रमाणात माहिती लक्षात ठेवून त्यावर प्रक्रिया करण्याची क्षमता होय. म्यूज स्पार्क 1.1 मधील मोठी कॉन्टेक्स्ट क्षमता हे त्याचे महत्त्वाचे वैशिष्ट्य मानले जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande