शिरपूर येथील गौण खनिज चोरी प्रकरणाची चौकशी करणार - डॉ. पंकज भोयर
मुंबई, 10 जुलै (हिं.स.)। : शिरपूर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गौण खनिज चोरीप्रकरणी दाखल गुन्ह्याची सखोल चौकशी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माध्यमातून करण्यात येणार असून, पोलीस महानिरीक्षक स्तरावरूनही आवश्यक ती कार्यवाही केली जाईल, असे राज्यमंत्री डॉ. भोय
शिरपूर येथील गौण खनिज चोरी प्रकरणाची चौकशी करणार - डॉ. पंकज भोयर


मुंबई, 10 जुलै (हिं.स.)। : शिरपूर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गौण खनिज चोरीप्रकरणी दाखल गुन्ह्याची सखोल चौकशी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माध्यमातून करण्यात येणार असून, पोलीस महानिरीक्षक स्तरावरूनही आवश्यक ती कार्यवाही केली जाईल, असे राज्यमंत्री डॉ. भोयर यांनी सांगितले.

सदस्य चंद्रकांत रघुवंशी यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती.

राज्यमंत्री डॉ. भोयर यांनी सांगितले की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सूडबुद्धीने गुन्हे दाखल करण्यात आल्याचा कोणताही प्रकार झालेला नाही. शिरपूर शहर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत गौण खनिज चोरीसंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाळू चोरी करणाऱ्या वाहनाचा पाठलाग करताना संबंधित मंडळ अधिकारी व इतर शासकीय कर्मचाऱ्यांना वाहनाने धडक देण्याचा प्रयत्न झाल्याचे पोलिसांच्या प्राथमिक माहितीत नमूद आहे. त्यानंतर वाहन थांबविल्यानंतर चालकाने काही व्यक्तींना बोलावून शासकीय कर्मचाऱ्यांशी मारहाण केल्याचा प्रकार घडल्याचे त्यांनी सांगितले.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande