
लातूर, 11 जुलै (हिं.स.) जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, लातूर यांच्या वतीने 'पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्या'चे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत अहमदपूर तालुक्यातील उजना येथील सिद्धी शुगर अँड अलाईड इं. लि. (महेश नगर) येथे विविध पदांच्या प्रशिक्षणासाठी अहमदपूर आणि चाकूर तालुक्यातील युवकांसाठी सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. या प्रशिक्षणाचा लाभ घेण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी युवकांना केले आहे.
या उपक्रमाद्वारे १८ ते ३५ वयोगटातील युवकांना एकूण २७ जागांवर प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या प्रशिक्षणाचा कालावधी ११ महिन्यांचा असून, यासाठी १२ वी उत्तीर्ण, आय.टी.आय., इंजिनिअरींग डिप्लोमा, ॲग्री डिप्लोमा तसेच बी.ए., बी.कॉम., बी.एस.सी., एम.कॉम. व एम.एस.सी. पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेले उमेदवार पात्र आहेत. यामध्ये ट्रेनी, ट्रेनी नर्स (ए.एन.एम./जी.एन.एम.), ट्रेनी एसी मेकॅनिक, ट्रेनी इंस्ट्रुमेंटेशन, ट्रेनी सिव्हिल सुपरवायझर व ट्रेनी सिव्हिल क्लार्क अशा विविध पदांचा समावेश आहे.
इच्छुक उमेदवारांनी १० जुलै २०२६ ते १३ जुलै २०२६ या कालावधीत ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे. यासाठी https.www.cmykpy.mahaswayam.gov.in या लिंकचा वापर करता येईल. ऑनलाईन रजिस्ट्रेशनव्यतिरिक्त उमेदवार आवश्यक कागदपत्रांसह महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेबजी पाटील यांच्या अहमदपूर येथील संपर्क कार्यालयात भेट देऊन नोंदणी करू शकतात.
निवड झालेल्या उमेदवारांची मुलाखत मंगळवार, दि. १४ जुलै २०२६ रोजी दुपारी ०१:०० वाजता सिद्धी शुगर कारखाना, उजना येथे घेण्यात येईल. तसेच, दि. १५ जुलै २०२६ रोजी सकाळी १०:०० ते ०२:०० या वेळेत राज्य प्रशिक्षण संस्था (आय.टी.), अहमदपूर येथे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. अर्ज करताना उमेदवारांनी [Aadhaar Redacted], बँक पासबुक, शैक्षणिक कागदपत्रे, रहिवासी प्रमाणपत्र आणि १० वीची सनद/टी.सी. सोबत ठेवणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी ७७७४०४४५१७ किंवा ९८३४९३९१४९ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis