परभणी जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीसाठी उमेदवारांना चिन्हांचे वाटप
परभणी, 11 जुलै (हिं.स.)। परभणी जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात आले. बँकेच्या एकूण 21 संचालक पदांपैकी 13 संचालक बिनविरोध निवडून आले असून उर्वरित 8 जागांसाठी निवडणूक
Q


परभणी, 11 जुलै (हिं.स.)। परभणी जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात आले. बँकेच्या एकूण 21 संचालक पदांपैकी 13 संचालक बिनविरोध निवडून आले असून उर्वरित 8 जागांसाठी निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी 19 जुलै रोजी मतदान तर 20 जुलै रोजी मतमोजणी होणार आहे.

प्राथमिक कृषी पतपुरवठा विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था गटातील पूर्णा मतदारसंघातून नंदकुमार डाखोरे यांना ऑटोरिक्षा, तुळशीराम बोबडे यांना कपबशी, मानवत मतदारसंघातून अमोल कदम यांना ऑटोरिक्षा व आकाश चोखट यांना कपबशी, हिंगोली मतदारसंघातून राजामती मुटकुळे यांना कपबशी, रमेश शिंदे यांना छत्री व गुलाबराव सरकटे यांना कपाट, तर वसमत मतदारसंघातून तुषार जाधव यांना अंगठी आणि चंद्रकांत नवघरे यांना कपबशी हे चिन्ह देण्यात आले. कळमनुरी मतदारसंघातून दत्तराव कदम यांना कपाट व बालासाहेब मगर यांना छताचा पंखा हे चिन्ह मिळाले.

इतर शेती संस्था गटातून खान सय्यद शेरगुल खान यांना छत्री, प्रीती जाधव यांना जग, विजय जामकर यांना कपबशी, विजयकुमार मोरे यांना मोबाईल आणि सय्यद हरसान हुसैनी यांना चष्मा हे चिन्ह देण्यात आले. अनुसूचित जाती-जमाती मतदारसंघातून प्रशास ठाकूर यांना अंगठी, शोभा बोबडे यांना कपबशी, तुकाराम रुमाले यांना ट्रॅक्टर, यशवंतराव वाटोड यांना शिटी, अतुल सरोदे यांना छत्री आणि संजय सारणीकर यांना हेलिकॉप्टर हे चिन्ह देण्यात आले. तर विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग मतदारसंघातील उमेदवार अभय कुंडगीर यांना खटारा, स्वराजसिंह परिहार यांना छत्री, सुनंदा फुलके यांना शिटी, दत्तात्रय मायंदळे यांना कपबशी आणि बळीराम सोरेकर यांना शिवणयंत्र हे निवडणूक चिन्ह देण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande