बीड जिल्ह्यातील बुडालेल्या मल्टिस्टेट बँकांमधील ठेवीदारांच्या प्रश्नावर महत्त्वपूर्ण बैठक संपन्न
बीड, 11 जुलै (हिं.स.)। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बीड जिल्ह्यातील बुडालेल्या मल्टिस्टेट बँकांमधील ठेवीदारांच्या प्रश्नावर महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. मागील काही वर्षांत जिल्ह्यातील काही मल्टिस्टेट बँकांमधील गैरव्यवह
Q


बीड, 11 जुलै (हिं.स.)। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बीड जिल्ह्यातील बुडालेल्या मल्टिस्टेट बँकांमधील ठेवीदारांच्या प्रश्नावर महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. मागील काही वर्षांत जिल्ह्यातील काही मल्टिस्टेट बँकांमधील गैरव्यवहारामुळे हजारो सर्वसामान्य ठेवीदारांचे कोट्यवधी रुपये अडकले. आयुष्यभराची बचत गमावलेल्या नागरिकांना न्याय मिळावा, हा आमचा सातत्यपूर्ण प्रयत्न आहे.

मागील आठवड्यात आ.सुरेशआण्णा धस, आ. प्रकाश दादा सोळंके यांच्यासह मी राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांची भेट घेऊन या विषयावर तातडीने उच्चस्तरीय बैठक घेण्याची मागणी केली होती. त्यावेळी दिलेल्या आश्वासनानुसार आज ही बैठक पार पडली. बैठकीस जिल्ह्यातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, तपास यंत्रणांचे अधिकारी तसेच संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

ठेवीदारांच्या घामाच्या पैशावर कुणाचाही डल्ला चालू देणार नाही. प्रत्येक ठेवीदाराला त्याच्या हक्काचे पैसे मिळवून देण्यासाठी माझा संघर्ष शेवटपर्यंत सुरू राहील. हा माझा शब्द आहे. सामान्य माणसाच्या न्यायासाठी, पारदर्शक व्यवस्थेसाठी आणि ठेवीदारांच्या हक्कासाठी माझा लढा अविरत सुरू राहील.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande