परभणीच्या मातोश्री नगरात घरफोडी; गुन्हा दाखल
परभणी, 11 जुलै (हिं.स.)। परभणी शहरातील मातोश्री नगर परिसरातील एका बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा सुमारे 93 हजार 423 रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी नवा मोंढा पोलीस ठ
परभणीच्या मातोश्री नगरात घरफोडी; गुन्हा दाखल


परभणी, 11 जुलै (हिं.स.)। परभणी शहरातील मातोश्री नगर परिसरातील एका बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा सुमारे 93 हजार 423 रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी नवा मोंढा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किशनराव बापुराव कदम (वय 74, रा. मातोश्री नगर, परभणी) हे आपल्या मुलगी सोनाली कदम यांच्यासह घराला कुलूप लावून सातारा येथे मुलाखतीसाठी गेले होते. त्यानंतर ते पुणे येथे मुलाकडे मुक्कामी राहिले. किशनराव कदम हे परभणीतील घरी परतले असता घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तुटलेले आढळून आले. घरात प्रवेश करून पाहणी केली असता सर्व साहित्य अस्ताव्यस्त पडलेले दिसले. बेडरूममधील लोखंडी कपाटाचे कुलूप तोडून त्यामधील सोन्याचे दागिने तसेच दुसर्या कपाटातील रोख रक्कम चोरीस गेल्याचे निदर्शनास आले. चोरीस गेलेल्या ऐवजात 27.610 ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण, 6.960 ग्रॅम वजनाचे सोन्याचे नेकलेस, 2.860 ग्रॅम वजनाचे मणी मंगळसूत्र, पाच रुपयांची 500 नाणी आणि 500 रुपयांच्या सात नोटांचा समावेश आहे. या सर्व ऐवजाची एकूण किंमत 93 हजार 423 रुपये असल्याचे फिर्यादीने नमूद केले.

अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश करत चोरी केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. याप्रकरणी नवा मोंढा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande