
छत्रपती संभाजीनगर, 11 जुलै (हिं.स.)। १०० टक्के काम पूर्ण केलेल्या बी एल ओ चा सत्कार जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांनी कन्नड तालुक्यातील मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनःरीक्षण (एस आय आर) कामाचा सविस्तर आढावा घेतला. तसेच एस आय आर चे शंभर टक्के कार्य पूर्ण करणाऱ्या मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बी एल ओ)यांचा सत्काराही त्यांनी केला.
उपविभागीय अधिकारी संतोष गोरड, तहसीलदार सारिका भगत तसेच इतर तालुका स्तरीय अधिकारी यांची यावेळी उपस्थिती होती.
एस आय आर चे १०० टक्के काम पूर्ण करणारे मतदान केंद्र क्रमांक 184,325,279 येथील बी एल ओ यांचा सत्कार करण्यात आला.
जिल्हाधिकारी गौडा यांनी कन्नड तालुक्यातील अंधानेर येथील जिल्हा परिषद शाळेस भेट देऊन एस आय आर कामाचा आढावा घेतला. तसेच वृक्षारोपण केले सोबतच येथे असणाऱ्या घनदाट वन येथे ही भेट दिली,
मुंडवाडी येथे असणाऱ्या आदर्श शेतकरी तेजराव बारगळ संचलित अंकुर रोपवाटिकेसही त्यांनी भेट दिली. शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांना संजय गांधी निराधार योजनेचे मंजुरी पत्र त्यांच्या हस्ते वितरित करण्यात आले. औराळा भागातही जिल्हाधिकारी गौडा यांनी बी एल ओ यांची भेट घेऊन एस आय आर कामाची गती वाढवावी यासाठी मार्गदर्शन केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis