उदगीरमध्ये श्री स्वामी समर्थ पादुका पालखीचे भक्तिमय स्वागत
लातूर, 11 जुलै (हिं.स.)। अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ महाराजांची पवित्र पादुका पालखी प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही महाराष्ट्रासह कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील विविध शहरांमधून भक्तांना दर्शन देत प्रवास करत आहे. या वार्षिक पालखी सोहळ्यांतर्गत पालखीचे उ
श्री स्वामी समर्थांची पालखी


लातूर, 11 जुलै (हिं.स.)। अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ महाराजांची पवित्र पादुका पालखी प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही महाराष्ट्रासह कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील विविध शहरांमधून भक्तांना दर्शन देत प्रवास करत आहे. या वार्षिक पालखी सोहळ्यांतर्गत पालखीचे उदगीर शहरात भक्तिभावाने आगमन झाले.

उदगीरचे माजी नगराध्यक्ष राजेश्वरजी निटुरे यांच्या निवासस्थानी या पालखीचा दरवर्षी मुक्काम असतो. याही वर्षी परंपरेनुसार पालखीचे स्वागत करण्यात आले. यावेळी श्री स्वामी समर्थांच्या पादुकांची विधिवत पूजा करून महाआरती करण्यात आली. उपस्थित भक्तांनी स्वामी समर्थांच्या जयघोषात भक्तिमय वातावरण अनुभवले. या प्रसंगी उदगीर शहरातील अनेक मान्यवर, स्वामी भक्त आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande