लातूर : आरक्षण उपवर्गीकरणाच्या विरोधात अहमदपूरमध्ये महामोर्चाचा निर्णय
लातूर, ११ जुलै (हिं.स.) : अनुसूचित जाती (SC) आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी अहमदपूर येथे भव्य महामोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या महामोर्चाच्या नियोजनासाठी शासकीय विश्रामगृहात सर्वपक्षीय आणि व्यापक बैठक आयोजित करण
सर्वपक्षीय बैठक संपन्न


लातूर, ११ जुलै (हिं.स.) : अनुसूचित जाती (SC) आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी अहमदपूर येथे भव्य महामोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या महामोर्चाच्या नियोजनासाठी शासकीय विश्रामगृहात सर्वपक्षीय आणि व्यापक बैठक आयोजित करण्यात आली होती.

डॉ. ओ. एल. किनगावकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला आंबेडकरवादी चळवळीतील विविध राजकीय पक्षांचे नेते, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, युवक कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने बौद्ध समाजातील नागरिक उपस्थित होते. विद्रोही कवी राजेंद्र कांबळे आणि आंबेडकरवादी युवा कार्यकर्त्यांच्या आवाहनावरून या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

बैठकीत आरक्षण उपवर्गीकरणाच्या निर्णयाविरोधात व्यापक जनआंदोलन उभारण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. सकल बौद्ध अनुयायांच्या नेतृत्वाखाली आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वारसदारांच्या विशेष उपस्थितीत हा महामोर्चा काढण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला.

आरक्षणाचे संरक्षण करणे ही काळाची गरज असल्याचे मत बैठकीत व्यक्त करण्यात आले. या महामोर्चामध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन उपस्थित नेत्यांनी केले. तसेच समाजातील सर्व घटकांनी एकजूट दाखवत या प्रश्नावर आपला निषेध नोंदवावा, असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

---------------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande