
बीड, 11 जुलै (हिं.स.)आधीच निसर्गाच्या अवकृपेने बीड जिल्ह्यात आणि केज तालुक्यात पाऊस कमी असताना शेतकऱ्यांनी नामांकित कंपनीचे सोयाबीनचे पेरलेले बियाणे उगवले नसल्याने शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे तक्रारी केल्या आहेत. केज तालुक्यातील शेतकऱ्यांनी सुमारे ६५ हजार हेक्टर क्षेत्रावर मुख्य नगदी पीक म्हणून खरीप हंगामात पेरणी केलेली आहे. केज तालुक्यातील साळेगाव, नांदुरघाट, युसुफवडगाव बनसारोळा, तांबवा, मांगवडगाव येथील शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात पेरणी केलेले महाबीज कंपनीचे व जे एस कंपनीचे सोयाबीनचे वाण उगवले नाही. सदर शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडे तक्रारी दाखल केलेल्या आहेत. तक्रारी प्राप्त झाल्या नंतर उपविभागीय कृषी अधिकारी राहुल गायकवाड, कृषी विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञ प्रा. अरुण गुट्टे, केज तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील गुणवत्ता विभागाचे पवन मुंडे आणि सोनवणे यांनी शेतात जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. बियाणे खरेदी केलेले बियाणे उगवले नाही; म्हणून त्यांनी कृषी दुकानदार जाधव यांना कळविल्या नंतर दुसऱ्यांदा घेतलेले बियाणे सडलेले निघाले.
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis