गंगाखेड–परभणी मार्गावर अपघात; रस्त्यावरील भेगात चाक अडकल्याने तरुणाचा मृत्यू
परभणी, 11 जुलै (हिं.स.)। गंगाखेड ते परभणी या दरम्यान रस्त्यावर पडलेल्या भेगात चाक अडकल्याने व दुचाकी अनियंत्रित होऊन दुभाजकावर आदळल्याने एका 28 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. गंगाखेड पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला. गंगाखेड ते परभणी
गंगाखेड–परभणी मार्गावर अपघात; रस्त्यावरील भेगात चाक अडकल्याने तरुणाचा मृत्यू


परभणी, 11 जुलै (हिं.स.)। गंगाखेड ते परभणी या दरम्यान रस्त्यावर पडलेल्या भेगात चाक अडकल्याने व दुचाकी अनियंत्रित होऊन दुभाजकावर आदळल्याने एका 28 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. गंगाखेड पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला.

गंगाखेड ते परभणी या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर भेगा पडल्या आहेत. त्या भेगा आता वाहनधारकांच्या दृष्टीने जीवघेण्या ठरु लागल्या आहेत. महातपुरी येथे शेख अनिस शेख कालू हा 28 वर्षीय तरुण मित्रासह दुचाकीवरुन महातपुरीकडे जात असतांना परळी नाक्याच्या पुढे एका पेट्रोल पंपासमोर दुचाकीचे चाक रस्त्यावरील भेगात अडकल्याने व वाहन अनियंत्रीत होऊन दुभाजकावर आदळल्याने मोटरसायकलस्वार शेख अनिस शेख कालू जखमी झाले. प्रत्यक्षदर्शनींनी तात्काळ या जखमींना परभणीच्या रुग्णालयात दाखल केले खरे, परंतु या युवकाचा दुर्देवी मृत्यू झाला.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande