पथ्रोट पोलिसांची धडक कारवाई; देशी कट्ट्यासह युवक अटकेत,
अमरावती, 11 जुलै (हिं.स.) : अचलपूर तालुक्यातील कासमपूर येथे पथ्रोट पोलिसांनी धडक कारवाई करत एका युवकाला देशी बनावटीच्या कट्ट्यासह अटक केली. त्याच्याकडून एक देशी पिस्तूल, दोन मॅगझिन आणि तीन जिवंत काडतुसे असा एकूण २३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्
पथ्रोट पोलिसांची धडक कारवाई; देशी कट्ट्यासह युवक अटकेत,


अमरावती, 11 जुलै (हिं.स.) : अचलपूर तालुक्यातील कासमपूर येथे पथ्रोट पोलिसांनी धडक कारवाई करत एका युवकाला देशी बनावटीच्या कट्ट्यासह अटक केली. त्याच्याकडून एक देशी पिस्तूल, दोन मॅगझिन आणि तीन जिवंत काडतुसे असा एकूण २३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

जिल्हा पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांच्या निर्देशानुसार अवैध शस्त्र बाळगणारे तसेच सोशल मीडियावर शस्त्रांचे प्रदर्शन करून दहशत निर्माण करणाऱ्यांविरोधात विशेष मोहीम सुरू आहे. त्याअंतर्गत आज पथ्रोट पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे कासमपूर येथील अनिकेत रविंद्र महाजन (वय २४) याच्या घरावर छापा टाकण्यात आला. झडतीदरम्यान घरातून देशी कट्टा, दोन मॅगझिन आणि तीन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. चौकशीत आरोपीने हे शस्त्र अर्जुन नगर (अमरावती) येथील विपुल भानुदास ठाकरे याच्याकडून घेतल्याची कबुली दिली. याप्रकरणी पथ्रोट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेला अनिकेत महाजन पोलीस कोठडीत असून फरार आरोपी विपुल ठाकरे याचा पोलीस शोध घेत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande