प्रवीण दरेकरांची भारतीय राष्ट्रीय सहकारी संघाच्या संचालकपदी बिनविरोध निवड
मुंबई, ११ जुलै (हिं.स.) : महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचे अध्यक्ष व भाजपा गटनेते आमदार प्रवीण दरेकर यांची भारतीय राष्ट्रीय सहकारी संघाच्या संचालक पदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. बिनविरोध निवड झाल्याने आ. दरेकर यांच्यावर सहकार क्षेत्रासह अन्य स्तर
प्रविण दरेकर


दरेकर मुख्यमंत्री फडणवीस


मुंबई, ११ जुलै (हिं.स.) : महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचे अध्यक्ष व भाजपा गटनेते आमदार प्रवीण दरेकर यांची भारतीय राष्ट्रीय सहकारी संघाच्या संचालक पदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. बिनविरोध निवड झाल्याने आ. दरेकर यांच्यावर सहकार क्षेत्रासह अन्य स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.

आमदार प्रवीण दरेकर हे मुंबई बँकेचे अध्यक्ष आहेत. त्याचबरोबर ते महाराष्ट्र राज्य सहकारी संघ, महाराष्ट्र गृहनिर्माण स्वयं/समूह पुनर्विकास प्राधिकरणाची धुरा सांभाळत आहेत. सहकार क्षेत्रात त्यांचा मोठा प्रभाव आहे. सहकारात नवनवीन योजना आणून त्याचा लाभ सर्वसामान्य, गोरगरीब जनतेला कसा होईल यावर नेहमीच त्यांनी जास्त भर दिला आहे. मुंबईतील सर्वसामान्य जनतेसाठी मोठे घर उपलब्ध व्हावे यासाठी स्वयं पुनर्विकास योजना असो वा मुंबई बँकेमार्फत लाडक्या बहिणींना शून्य टक्के व्याजदराने उद्योगधंद्यासाठी कर्ज उपलब्ध करून देणे असो किंवा विधिमंडळात सहकार क्षेत्राशी निगडित प्रश्न मांडून त्याला न्याय देण्याचा प्रयत्नही त्यांनी केला आहे. सर्वसामान्यांसह सहकाराला बळकटी कशी देता येईल याचाच आ. दरेकर सातत्याने प्रयत्न करत आहेत.

त्यांची भारतातील सर्व क्षेत्रांतील सहकारी चळवळीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सर्वोच्च अशी शिखर संस्था असलेल्या भारतीय राष्ट्रीय सहकारी संघाच्या संचालकपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. आ. दरेकर यांच्या निवडीने राज्यातील सहकार क्षेत्रात व सहकारी कार्यकर्त्यांत प्रचंड उत्साहाचे वातावरण आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande