रत्नागिरी : भूमी अभिलेख विभागातील भरतीची जाहिरात बनावट
रत्नागिरी, 11 जुलै (हिं.स.) । सोशल मीडिया आणि इतर माध्यमांवर सध्या भूमी अभिलेख विभागामध्ये भरती प्रक्रिया सुरू असल्याबाबतच्या काही जाहिराती फिरत आहेत. मात्र, ही पूर्णपणे बनावट जाहिरात असून अशा कोणत्याही फसव्या जाहिरातींना बळी पडू नये, असे आवाहन रत्
रत्नागिरी : भूमी अभिलेख विभागातील भरतीची जाहिरात बनावट


रत्नागिरी, 11 जुलै (हिं.स.) । सोशल मीडिया आणि इतर माध्यमांवर सध्या भूमी अभिलेख विभागामध्ये भरती प्रक्रिया सुरू असल्याबाबतच्या काही जाहिराती फिरत आहेत. मात्र, ही पूर्णपणे बनावट जाहिरात असून अशा कोणत्याही फसव्या जाहिरातींना बळी पडू नये, असे आवाहन रत्नागिरीचे भूमी अभिलेख जिल्हा अधीक्षक सचिन इंगळी यांनी केले आहे.

सध्या विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर भूमी अभिलेख विभागात नोकरीच्या सुवर्णसंधी असल्याच्या जाहिराती आणि मेसेज मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. त्याबाबत श्री. इंगळे यांनी व्हिडिओ संदेश जारी करून स्पष्टीकरण दिले आहे.

कार्यालयात येऊन खातरजमा करा, असे श्री. इंगळी यांनी सांगितले.

अशा प्रकारच्या बनावट जाहिरातींच्या अनुषंगाने कोणाला नियुक्तीपत्रे मिळाली असतील, तर त्यांनी थेट भूमी अभिलेख कार्यालयात येऊन त्याची सत्यता तपासून घ्यावी, असेही श्री. इंगळी यांनी स्पष्ट केले आहे.

नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या टोळ्यांवर कडक कारवाई होणे गरजेचे आहे. त्यामुळे अशा बनावट जाहिराती पसरवून किंवा नियुक्ती पत्रांच्या नावाखाली आर्थिक फसवणूक करणाऱ्या लोकांविरुद्ध नागरिकांनी त्वरित संबंधित पोलीस ठाण्यात रीतसर गुन्हा दाखल करावा, असे आवाहनही श्री. इंगळी यांनी केली आहे. नागरिकांनी अधिकृत माहितीसाठी शासकीय संकेतस्थळांचा किंवा कार्यालयाचा वापर करावा, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande