
छत्रपती संभाजीनगर, 11 जुलै (हिं.स.)।भरोसा सेल (दामिनी पथक), छत्रपती संभाजीनगर ग्रामीण यांच्या वतीने पोलीस ठाणे फुलंब्री हद्दीतील सावंगी बीट अंतर्गत संस्कृती विद्यालय येथे विद्यार्थ्यांसाठी जनजागृती व मार्गदर्शनपर कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमास शाळेतील सुमारे 150 ते 180 विद्यार्थी उपस्थित होते. विद्यार्थ्यांना गुड टच - बॅड टच, महिलांविषयीचे कायदे, डायल 112 आपत्कालीन सेवा, मोबाईल व सोशल मीडियाच्या अतिवापराचे दुष्परिणाम, सायबर गुन्हे, अमली पदार्थांचे दुष्परिणाम, लहान वयात मुला-मुलींनी पळून जाण्याचे दुष्परिणाम, बालविवाह प्रतिबंध तसेच पोलीस शस्त्रांविषयी माहिती याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.कार्यक्रमास शाळेचे शिक्षकवृंद उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी मार्गदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत विविध विषयांवर प्रश्न विचारून शंकांचे निरसन करून घेतले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis