बीड - ज्ञानेश्वर महाराजांच्या आजोबांच्या समाधीचा मुक्ताई मार्ग मोकळा
बीड, 11 जुलै (हिं.स.)बीड शहरासह जिल्हा एका ऐतिहासिक अशा निर्णयाचा साक्षीदार ठरला गेला आणि तो निर्णय म्हणजे बीड शहरातील ''सुभाष रोड'' या मार्गाचे नामकरण ''संत मुक्ताई मार्ग'' या ऐतिहासिक निर्णयातून या ऐतिहासिक निर्णयाचे लाखो शहरवासियांसह या मु
Q


बीड, 11 जुलै (हिं.स.)बीड शहरासह जिल्हा एका ऐतिहासिक अशा निर्णयाचा साक्षीदार ठरला गेला आणि तो निर्णय म्हणजे बीड शहरातील 'सुभाष रोड' या मार्गाचे नामकरण 'संत मुक्ताई मार्ग' या ऐतिहासिक निर्णयातून या ऐतिहासिक निर्णयाचे लाखो शहरवासियांसह या मुक्ताई पालखी सोहळ्यात उपस्थित असलेले वारकरी व महंत साक्षीदार ठरले गेले तर आज घेतलेल्या या निर्णयाने पूर्ण चंपावती नगरीमध्ये भक्तीमय वातावरण निर्माण होऊन गेले हे मात्र निश्चितच.

आमदार विजयसिंह पंडित यांनी बीड नगरपरिषद निवडणुकी वेळी दिलेला हा एक शब्द आज ऐतिहासिक क्षणातून पूर्ण झाला व तो पूर्ण शहरवासियांच्या साक्षीने.आमदार विजयसिंह पंडित यांनी बीड नगरपरिषद ताब्यात आल्यापासून असे अनेक ऐतिहासिक निर्णय घेतलेलेच आहेत त्यापैकी आज हा एक वारकरी सांप्रदायिक ऐतिहासिक असा क्षण त्यांच्या व शिष्ट मंडळाच्या प्रयत्नातून शहरवासीयांच्या सांप्रदायिक अभिमानाच्या गौरवशालीसाठी अमलात आणला गेला व या निर्णयातून वारकरी, सांप्रदायिक, शहरवासिय भारावून निश्चितच गेले हे या आजच्या ऐतिहासिक क्षणाचे वास्तव सत्य.

गेल्या अनेक वर्षांपासून याच शहरात वास्तवास असलेले राजकीय, सामाजिक,सांप्रदायिक तथा अनेक जाती-धर्मातील नागरिकांनी हा मार्ग 'मुक्ताई मार्ग' म्हणून घोषित करावा अशी मागणी लावून धरलेली होती तर यातील भागवतजी तावरे सह त्यांची टीम ही गेली अनेक वर्ष या मार्गाचा प्रस्ताव सर्व जातीधर्मीयातील साक्षीदारांच्या वतीने मान्य व्हावा यासाठी खसता खात होती हे विसरता येणारे नसून हा प्रस्ताव प्रत्यक्षात अमलात येईपर्यंत तावरे यांच्या टीमसह या शहरातील अनेक विविध सामाजिक तथा राजकीय व सांप्रदायिक नागरिकांनी वेळोवेळी उच्चस्तरीय पाठपुराव्यासह स्थानिक नगरपालिकेचा देखील पाठपुरावा हा ऐतिहासिक क्षण शहरवासीयांनी अनुभवावा यासाठी केलेला होता.

अखेर सर्वांच्या पाठपुराव्याला व प्रार्थनेला यश प्राप्त होत हा ऐतिहासिक व ना भुतो ना भविष्य असा ऐतिहासिक मार्ग सोहळा याच जिल्ह्यातील व महाराष्ट्रातील ख्यातनाम व महान संत महंत यांच्या उपस्थितीत संपन्न झाला व मुक्ताई मार्गाने आज मुक्ताई पालखी सोहळा आजोबाच्या भेटीसाठी मार्गस्थ झाला.... जय हरी माऊली

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande