यवतमाळ जिल्ह्यात पावसाचा खंड; जलाशयांत केवळ ४७.७९ टक्के पाणीसाठा
यवतमाळ 11 जुलै (हिं.स.) | पावसाळ्याचा जवळपास दीड महिन्याचा कालावधी उलटला आहे, असे असताना जिल्ह्यात काही मोजके दिवस पाऊस झाला असून, पेरण्या आटोपत आल्या आहे. मात्र या पावसामुळे जिल्ह्यातील जलाशयांमध्ये पाण्याच्या पातळीत फारशी वाढ झाल्याचे दिसत नाही.
पावसाळ्याचा दीड महिना उलटूनही जलाशयामधील साठ्यात वाढ नाही


यवतमाळ 11 जुलै (हिं.स.) | पावसाळ्याचा जवळपास दीड महिन्याचा कालावधी उलटला आहे, असे असताना जिल्ह्यात काही मोजके दिवस पाऊस झाला असून, पेरण्या आटोपत आल्या आहे. मात्र या पावसामुळे जिल्ह्यातील जलाशयांमध्ये पाण्याच्या पातळीत फारशी वाढ झाल्याचे दिसत नाही. सध्या सर्व जलाशयांमध्ये मिळून ४७.७९ टक्के पाण्याचा साठा आहे. हा साठा गेल्या वर्षी याच काळात असलेल्या जलसाठ्याच्या तुलनेत ५ टक्के अधिक असला तरी पावसाळ्यात जलाशये भरली नाही तर पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यातच आता पावसाने पुन्हा दडी मारली असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

यंदा सुपर अलनिनोच्या प्रभावामुळे राज्यासह देशात पाऊस कमी प्रमाणात होणार, असा अंदाज सुरूवातीपासून हवामान विभागाने व्यक्त केला आहे. त्यामुळे राज्यात दुष्काळी उपाययोजना राबवण्यावर भर देण्यात येत आहे. याच सुपर अलनिनोचा प्रभाव पडून जूनमध्ये पावसाने दडी मारली.

दोन नक्षत्र आटोपल्यानंतर जूनच्या शेवटच्या आठवडवड्यात जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली. अवघ्या काही दिवसात जोरात बरसलेल्या पावसाने जूनच्या सरासरीच्या तुलनेत भर काढण्याचा प्रयत्न केला. या पावसामुळे पेरण्या रखडलेल्या बळीराजाला दिलासा मिळाला असून, सर्वत्र पेरण्यांचा सपाटा सुरू झाला होता. त्यानंतर जुलैच्या सुरूवातीलाही काही भागात पावसाने हजेरी लावली मात्र त्यानंतर आता पावसाने दडी मारली आहे. मध्यंतरी बरसलेल्या पावसामुळे शेतात पेरण्या आटोपत आल्या असल्या तरी जमिनीवर पडलेला पाऊस अद्याप वाहून गेलेला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील ३ मोठे, ७ मध्यम आणि ६३ लघु या सर्व प्रकल्पांमध्ये मिळून सध्याच्या परिस्थितीत ४२.७९ टक्के पाण्याचा साठा शिल्लक आहे. हा पाण्याचा साठा गेल्या वर्षी याच कालावधीत प्रकल्पात शिल्लक असलेल्या ३७.५० टक्के पाणीसाठ्यापेक्षा ५ टक्के जास्त आहे, असे असले तरी पावसाळ्याचा दीड उर्वरित.

गेल्या वर्षी वेळचा जलसाठा - ३७.५० प्रकल्प आता २०२५ .अरुणावती ४१.३९ २५.३८ . पूस ३४.३७ ३८.८३ .बेंबळा ३८.३३ २९.१३ एकूण ३८.६७ २९.६९ जिल्ह्यात ६३ लघु प्रकल्प आहेत. यापैकी अनेक लघु प्रकल्पांवर त्याच्या शेजारी गावांमधील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था अवलंबून आहे. असे असल्याने त्या नागरिकांचे लक्ष परिसरात प्रकल्पात पाण्याचा साठा किती आहे हा साठा वाढणार कधी याकडे लागले आहे. अनेक लघु प्रकल्पांत ५० टक्क्यांपेक्षा कमी साठा असल्याने ही बाब चिंता वाढवणारी ठरत आहे. मोठे प्रकल्प साठा ३८.६९, मध्यम प्रकल्प ५६.०७, लघु प्रकल्प ३६.४२ एकूण जलसाठा ४२.७९ बेंबळा धरण (संग्रहीत छायाचित्र) जिल्ह्यात सात मध्यम प्रकल्प आहेत. या सर्व सात मध्यम प्रकल्पांमध्ये आता निम्म्यापेक्षा थोडा जास्त जलसाठा जमा झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यात गोकी प्रकल्पामध्ये ६०.६४ टक्के, वाघाडी मध्ये ५८.२६, सायखेडा मध्ये ४.२३, अधरपुस मध्ये ६७.००, बोरगाव मध्ये ३४.६४, अडाण मध्ये ४७.८१ तर नवरगांव प्रकल्पात ५२.७२ टक्के जलसाठा शिल्लक आहे. या मध्यम प्रकल्पांमध्ये एकुण ५६.०७ टक्के जलसाठा शिल्लक आहे. गेल्यावर्षी याच वेळी हा साठा केवळ ५१.६६ टक्के इतका होता.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande