मराठवाडा हायस्कूलच्या दोन विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय कामगिरी
पृथ्वीराज मुंजे जिल्ह्यात द्वितीय; श्रीकांत डुकरेही शिष्यवृत्तीधारक, विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव परभणी, 11 जुलै (हिं.स.)। फेब्रुवारी 2026 मध्ये घेण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य शिष्यवृत्ती परीक्षेत नूतन विद्या समिती संचलित मराठवाडा हायस्कूल
Q


पृथ्वीराज मुंजे जिल्ह्यात द्वितीय; श्रीकांत डुकरेही शिष्यवृत्तीधारक, विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव

परभणी, 11 जुलै (हिं.स.)।

फेब्रुवारी 2026 मध्ये घेण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य शिष्यवृत्ती परीक्षेत नूतन विद्या समिती संचलित मराठवाडा हायस्कूल, शिवाजीनगर, परभणीच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन करत संस्थेच्या शैक्षणिक परंपरेत आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. प्रशालेचे दोन विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक ठरल्याने विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

इयत्ता आठवीचा विद्यार्थी श्रीकांत डुकरे याने शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळवून आपली गुणवत्ता सिद्ध केली. विशेष म्हणजे तो राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती (एनएमएमएस) धारक विद्यार्थी असून त्याने पुन्हा एकदा आपल्या शैक्षणिक गुणवत्तेचा ठसा उमटविला आहे. तसेच इयत्ता पाचवीचा विद्यार्थी पृथ्वीराज मुंजे याने शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्ह्यात द्वितीय क्रमांक पटकावत उल्लेखनीय यश मिळविले. त्याने 300 पैकी 264 गुण प्राप्त करून जिल्हास्तरावर आपले वेगळेपण सिद्ध केले आहे.

या दोन्ही विद्यार्थ्यांना महाराष्ट्र शासनाकडून दरवर्षी 7 हजार 500 रुपयांची शिष्यवृत्ती मिळणार आहे. विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल नूतन विद्या समितीचे अध्यक्ष विजयराव जोशी, उपाध्यक्ष अनिल अष्टुरकर, दिलीप कुलकर्णी, सचिव संतोष धारासुरकर, मुख्याध्यापक अनंत पांडे आदींनी विद्यार्थी, पालक आणि मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande