
डोंबिवली, 11 जुलै (हिं.स.) | केडीएमसी शास्त्रीनगर रुग्णालयात डॉक्टर मारहाण प्रकरणात भाजपा नगरसेवकांनी रुग्णालयात डॉक्टरांची भेट घेतली. घडलेल्या घटनेच्या निषेध केला कल्याण डोंबिवलीत लवकरात लवकर सिविल हॉस्पिटल व्हाव यासाठी आम्ही सर्व नगरसेवक पालकमंत्र्यांची भेट घेऊन मागणी करणार आहोत अशी माहिती भाजपा शिष्टमंडळातील सर्व नेत्यांनी दिली.
शास्त्रीनगर हॉस्पिटलमध्ये शनिवारी सकाळी भाजपा शिष्टमंडळाने भेट देऊन तेथील संपूर्ण परिस्थितीची पाहणी केली. या शिष्टमंडळातील भाजपा कल्याण जिल्हाध्यक्ष नंदकिशोर परब, केडीएमसी भाजपा गटनेते शशिकांत कांबळे, नगरसेवक दीपेश म्हात्रे आणि नगरसेवक - नगरसेविका आणि पदाधिकारी यांनी पालिका मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपा शुल्क तसेच हॉस्पिटल मुख्य अधिकारी डॉक्टर यांच्याशी त्या घटनेबाबत व पुढे अशा घटना होऊ नयेत यावर चर्चा केली. दरम्यान नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी सांगितले की, भाजपा प्रदेशाध्यक्ष तथा आमदार रवींद्र चव्हाण हे संबंधित डॉक्टर, मुख्य वैद्यकीय अधिकारी आणि पालिका आयुक्त यांच्याशी संवाद साधून होते.
दरम्यान शुक्रवारी मनसे नेते राजू पाटील यांनी भाजपा स्थानिक आमदार व प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यावर सडेतोड टीका केली होती रवींद्र चव्हाण आहेत कुठे याबाबत बोलताना दीपेश म्हात्रे यांनी सांगितले की रवी म्हणजे सूर्य आणि सूर्यावर थुकल्यानंतर काय होत माहित आहे ना ! जे कधी कधी उगवतात त्यांच्याबद्दल आम्ही जास्त बोलणार नाही मात्र आम्ही डॉक्टर यांच्या पाठीशी आहोत सर्व प्रकाराची सोय सुविधा मिळावी यासाठी आम्ही प्रयत्न करतोय.
तर नंदकिशोर परब म्हणाले, जे घडलं ते चुकीच आहे. युतीतील पक्ष् म्हणून आम्ही शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे यांना योग्य ती समज देऊ. भाजपा प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण, मी आणि नगरसेवक दीपेश म्हात्रे हे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपा शुक्ला यांच्या संपर्कात होतो. शास्त्रीनगर रुग्णालय हे सिव्हिल हॉस्पिटल नाही. त्यामुळे त्याला काही मर्यादा आहेत. म्हणून आमची मागणी आहे हि सिव्हिल हॉस्पिटलसारखा या रुग्णालयाला दर्जा मिळाला पाहिजे. आता विरोधकाबाबत विचाराल तर आमचे कोणीही विरोधक नाही. जे विरोध करत होते ते आमच्या बरोबर सत्तेत आहेत.
तर शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टरांवरील मारहाण घटनेचा भारतीय जनता पार्टी निषेध करते. अशा घटना पुन्हा पुन्हा घडू नये याकरता भाजपाकडून जे काही सहकार्य करता येईल ते करू. ठाण्याच्या धर्तीवर हॉस्पिटल व्हायला पाहिजे असा पत्रव्यवहार आमदार चव्हाण यांनी केला होता. महायुती म्हणूनही आता आम्ही लवकरात लवकर सिव्हिल हॉस्पीटल कसे होईल यासाठी पाठपुरावा करू असे शशिकांत कांबळे यांनी सांगितले.
----------------------
हिंदुस्थान समाचार / Prashant Joshi