आषाढी वारीत भाविक रांगेत, तर मान्यवरांना स्वतंत्र दर्शन? महापालिकेवर आरोप
पुणे, 11 जुलै (हिं.स.)। आषाढी वारीनिमित्त भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिर आणि नाना पेठेतील निवडुंगा विठोबा मंदिर परिसरात संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पादुकांच्या दर्शनासाठी लाखो वारकरी आणि भाविकांनी गर्दी केली. विठ्ठल नाम
fdg


पुणे, 11 जुलै (हिं.स.)। आषाढी वारीनिमित्त भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिर आणि नाना पेठेतील निवडुंगा विठोबा मंदिर परिसरात संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पादुकांच्या दर्शनासाठी लाखो वारकरी आणि भाविकांनी गर्दी केली.

विठ्ठल नामाच्या अखंड गजरात भाविक अनेक तास रांगेत उभे राहून दर्शनाची प्रतीक्षा करत असतानाच, पुणे महापालिकेकडून काही निवडक मान्यवरांना विशेष 'व्हीआयपी पास'द्वारे स्वतंत्र मार्गाने दर्शनाची सुविधा देण्यात आल्याचा आरोप पुढे आला आहे. या आरोपांमुळे वारकरी आणि भाविकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले असून, महापालिकेच्या व्यवस्थापनावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

पुण्यात संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचा मुक्काम असल्याने दर्शनासाठी दिवसभर मोठी गर्दी झाली होती. उकाडा, धक्काबुक्की आणि दीर्घ प्रतीक्षा सहन करत हजारो भाविक दर्शनासाठी रांगेत उभे होते. याचवेळी काही निवडक व्यक्तींना विशेष पासच्या माध्यमातून जलद आणि स्वतंत्र दर्शनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याचा आरोप वारकऱ्यांनी केला आहे.

या प्रकारामुळे वारकरी संप्रदायाच्या 'माऊलीच्या दरबारात सर्व भक्त समान' या मूलभूत तत्त्वालाच धक्का बसल्याची भावना अनेक वारकऱ्यांनी व्यक्त केली. साधेपणा, समता आणि सर्वसमावेशकतेचा संदेश देणाऱ्या वारकरी परंपरेत अशा प्रकारची 'व्हीआयपी' व्यवस्था योग्य आहे का, असा सवालही उपस्थित केला जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande