सोलापूर - हमालाच्या घरफोडीचा २४ तासांत छडा; दोन सराईत चोरटे जेरबंद
सोलापूर, 11 जुलै (हिं.स.)। सोलापूर शहरातील नई जिंदगी परिसरातील एका हमालाच्या घरात चोरी करणाऱ्या दोन सराईत चोरट्यांना एमआयडीसी पोलिसांच्या डी.बी. पथकाने अवघ्या २४ तासांत अटक केली. आरोपींकडून चोरीतील सोने-चांदीचे दागिने, रोख रक्कम आणि गुन्ह्यात वापरण
fgdf


सोलापूर, 11 जुलै (हिं.स.)। सोलापूर शहरातील नई जिंदगी परिसरातील एका हमालाच्या घरात चोरी करणाऱ्या दोन सराईत चोरट्यांना एमआयडीसी पोलिसांच्या डी.बी. पथकाने अवघ्या २४ तासांत अटक केली. आरोपींकडून चोरीतील सोने-चांदीचे दागिने, रोख रक्कम आणि गुन्ह्यात वापरण्यात आलेली मोटारसायकल असा एकूण ६ लाख ३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गौरीशंकर नागनाथ कोळी (वय ५५, रा. बसवेश्वरनगर, नई जिंदगी, सोलापूर) यांच्या घरात घरफोडी करून चोरट्यांनी २८.९५ ग्रॅम सोन्याचे दागिने, ३६५ ग्रॅम चांदीचे दागिने तसेच २५ हजार रुपयांची रोख रक्कम असा सुमारे ५ लाख ३ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला होता.

या प्रकरणाचा तपास करताना एमआयडीसी पोलिसांनी जिबरान उर्फ शोएब युनूस शेख (वय २१, सध्या रा. नई जिंदगी, सोलापूर) आणि प्रशांत नागेश खंदारे (वय १९, रा. केशवनगर, सोलापूर) या दोघांना ताब्यात घेतले.

एमआयडीसी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भाऊराव बिराजदार आणि पोलिस निरीक्षक संगीता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डी.बी. पथकाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अल्फाज शेख, हवालदार अमर शिवसिंगवावले आणि नागेशसिंह चव्हाण यांनी बसवारूढ मठाजवळील शांतीनगर परिसरात सापळा रचून आरोपींना अटक केली.

चौकशीदरम्यान आरोपींकडून चोरीतील सोने-चांदीचे दागिने, रोख रक्कम तसेच मोटारसायकल असा एकूण ६ लाख ३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, या प्रकरणाचा पुढील तपास एमआयडीसी पोलीस करीत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande