
ठाणे, 11 जुलै, (हिं.स.) : अटल फाउंडेशनतर्फे आ. संजय केळकर यांच्या वाढदिवसानिमित्त १० जिल्ह्यांमध्ये भव्य 'वृक्षारोपण अभियान' अत्यंत उत्साहात राबविण्यात आले. ठाण्यातील सिव्हिल रुग्णालयात अन्नदान करण्यात आले तर उद्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, कळवा येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
वृक्षारोपण अभियान नांदेड, नाशिक, लातूर, बीड, सोलापूर, अकोला, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, परभणी आणि जालना या जिल्ह्यांत राबविण्यात आले.
नांदेड शहरात तीन वेगवेगळ्या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. हनुमान मंदिरात महाआरती आणि गोसेवा संकल्प पूर्ण करण्यात आला. नाशिकच्या पदाधिकाऱ्यांनी देखील अभियान यशस्वीपणे राबवले. एकूण १००१ वृक्षारोपणाचा संकल्प असून, त्यापैकी २०० वृक्षांची लागवड यशस्वीपणे पार पडली आहे. येत्या १५ जुलैपर्यंत १००१ वृक्षारोपणाचे उद्दिष्ट आणि उर्वरित जिल्ह्यांमधील अभियान पूर्ण केले जाईल.
ठाण्यात विविध ठिकाणी वृक्षारोपण, अन्नदान, विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप, गायत्री महायज्ञ, सप्तश्रुंगी गडावर देवीला अभिषेक आदी कार्यक्रम घेण्यात आले. उद्या रविवारी कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात रक्तदान शिबिराचे आयोजन कार्यकर्त्यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर