बीड - घाटनांदूरमध्ये भररस्त्यात तीक्ष्ण हत्याराने वार करून तरुणाची हत्या
बीड, 12 जुलै (हिं.स.)।अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूर येथील अण्णाभाऊ साठे चौकात एका तेवीस वर्षीय तरुणाची तीक्ष्ण हत्यारे आणि दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आल्याची भयानक घटना उघडकीस आली आहे. या जीवघेण्या हल्ल्यात त्याचा मित्र गंभीर जखमी झाला आ
बीड - घाटनांदूरमध्ये भररस्त्यात तीक्ष्ण हत्याराने वार करून तरुणाची हत्या


बीड, 12 जुलै (हिं.स.)।अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूर येथील अण्णाभाऊ साठे चौकात एका तेवीस वर्षीय तरुणाची तीक्ष्ण हत्यारे आणि दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आल्याची भयानक घटना उघडकीस आली आहे. या जीवघेण्या हल्ल्यात त्याचा मित्र गंभीर जखमी झाला आहे. भररस्त्यात घडलेल्या या रक्तरंजित घटनेमुळे परिसरात मोठी दहशत पसरली असून नागरिकांमध्ये तीव्र संताप आणि असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.

सूत्रांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, आपल्या एका मित्रासोबत दुचाकीवरून घाटनांदूर येथून पट्टीवडगाव या आपल्या गावाकडे जाण्यासाठी निघाला होता. हे दोघे अण्णाभाऊ साठे चौकात आले असता काही जणांनी त्यांची दुचाकी अचानक अडवली. काही समजण्याच्या आतच हल्लेखोरांनी तीक्ष्ण हत्यारे, दगड आणि विटांनी अमानुष हल्ला चढवला. या भयंकर मारहाणीत रक्ताच्या थारोळ्यात पडून मृत्यू झाला. त्याच्यासोबत असलेला मित्र या हल्ल्यात गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात तातडीने उपचार सुरू करण्यात आले आहेत. हा जीवघेणा हल्ला कोणत्या कारणास्तव झाला हे अद्याप समजू शकलेले नाही. कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे काढणाऱ्या या घटनेने सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

अद्याप या प्रकरणी अधिकृतपणे गुन्हा दाखल झालेला नसून अंबाजोगाई ग्रामीण पोलीस पुढील तपास करत आहेत. पोलीस तपासानंतरच अधिकृत माहिती समजू शकणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande