सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या दरात घसरण
- आठवडाभरात सोनं ४,३७० रुपयांनी स्वस्त नवी दिल्ली, 12 जुलै (हिं.स.)। देशातील सराफा बाजारात आज सोन्या-चांदीच्या दरात घसरणीचा कल पाहायला मिळाला. चेन्नई वगळता देशातील बहुतांश सराफा बाजारांमध्ये सोन्याच्या दरात प्रति १० ग्रॅम ४६० ते ४८० रुपयांची घट नो
gold and silver


- आठवडाभरात सोनं ४,३७० रुपयांनी स्वस्त

नवी दिल्ली, 12 जुलै (हिं.स.)। देशातील सराफा बाजारात आज सोन्या-चांदीच्या दरात घसरणीचा कल पाहायला मिळाला. चेन्नई वगळता देशातील बहुतांश सराफा बाजारांमध्ये सोन्याच्या दरात प्रति १० ग्रॅम ४६० ते ४८० रुपयांची घट नोंदवण्यात आली आहे. तर चेन्नईमध्ये सोन्याच्या दरात प्रति १० ग्रॅम ५१० ते ५६० रुपयांची घसरण झाली आहे. चांदीच्या दरातही मोठी घसरण झाली असून प्रति किलोग्रॅम ५,१०० रुपयांनी भाव खाली आले आहेत.

सोन्याच्या किमतीत झालेल्या घसरणीनंतर देशातील प्रमुख सराफा बाजारांमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर १ लाख ४४ हजार ३३० रुपये ते १ लाख ४५ हजार ९० रुपये प्रति १० ग्रॅम दरम्यान राहिला. तर २२ कॅरेट सोन्याचा भाव १ लाख ३२ हजार ३०० रुपये ते १ लाख ३३ हजार रुपये प्रति १० ग्रॅमच्या पातळीवर व्यवहार करत आहे. चांदीच्या किमतीत झालेल्या घसरणीनंतर दिल्ली सराफा बाजारात चांदीचा दर २ लाख ३५ हजार रुपये प्रति किलोग्रॅमवर आला आहे.

आठवड्याच्या तुलनेत पाहिल्यास सोन्या-चांदीच्या दरात मोठी कमजोरी झाली आहे. मागील आठवड्यात २४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम ४,३७० रुपयांपर्यंत कमी झाला. त्याचप्रमाणे २२ कॅरेट सोन्याच्या दरातही प्रति १० ग्रॅम ४,००० रुपयांपर्यंत घसरण झाली आहे. चांदीच्या दरातही चढ-उतारानंतर साप्ताहिक आधारावर प्रति किलोग्रॅम १५ हजार रुपयांची घट झाली आहे.

देशाची राजधानी दिल्लीमध्ये आज २४ कॅरेट सोन्याचा दर १ लाख ४४ हजार ४८० रुपये प्रति १० ग्रॅम, तर २२ कॅरेट सोन्याचा दर १ लाख ३२ हजार ४५० रुपये प्रति १० ग्रॅम नोंदवण्यात आला. आर्थिक राजधानी मुंबईमध्ये २४ कॅरेट सोन्याचा भाव १ लाख ४४ हजार ३३० रुपये आणि २२ कॅरेट सोन्याचा भाव १ लाख ३२ हजार ३०० रुपये प्रति १० ग्रॅम राहिला.

अहमदाबाद, भोपाळ आणि पाटणा येथे २४ कॅरेट सोन्याचा दर १ लाख ४४ हजार ३८० रुपये, तर २२ कॅरेट सोन्याचा दर १ लाख ३२ हजार ३५० रुपये प्रति १० ग्रॅम होता. चेन्नईमध्ये सोन्याचे दर तुलनेने जास्त असून २४ कॅरेट सोनं १ लाख ४५ हजार ९० रुपये आणि २२ कॅरेट सोनं १ लाख ३३ हजार रुपये प्रति १० ग्रॅमवर विकले जात आहे.

कोलकाता, जयपूर आणि लखनौ येथील सराफा बाजारातही सोन्याच्या दरात घसरण नोंदवण्यात आली. याशिवाय बेंगळुरू, हैदराबाद आणि भुवनेश्वर या शहरांमध्ये २४ कॅरेट सोन्याचा भाव १ लाख ४४ हजार ३३० रुपये, तर २२ कॅरेट सोन्याचा भाव १ लाख ३२ हजार ३०० रुपये प्रति १० ग्रॅमच्या पातळीवर राहिला. सराफा बाजारातील ही घसरण ग्राहकांसाठी खरेदीची संधी निर्माण करणारी ठरू शकते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande