दिंडोरी - राज्यस्तरीय स्क्वॉश स्पर्धेत शाहू पिंगळ यांची उल्लेखनीय कामगिरी
दिंडोरी, 12 जुलै, (हिं.स.)। पुणे येथील महाराष्ट्र स्क्वॉश अकादमीमध्ये आयोजित २०२६ महाराष्ट्र राज्य आंतरजिल्हा स्क्वॉश अजिंक्यपद स्पर्धेत दिंडोरी तालुक्यातील युवा खेळाडू शाहू प्रशांत पिंगळ यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत तृतीय क्रमांक पटकावला. शा
Shahu Pingal's remarkable


दिंडोरी, 12 जुलै, (हिं.स.)। पुणे येथील महाराष्ट्र स्क्वॉश अकादमीमध्ये आयोजित २०२६ महाराष्ट्र राज्य आंतरजिल्हा स्क्वॉश अजिंक्यपद स्पर्धेत दिंडोरी तालुक्यातील युवा खेळाडू शाहू प्रशांत पिंगळ यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत तृतीय क्रमांक पटकावला. शाहू पिंगळ यांनी स्पर्धेदरम्यान सातत्यपूर्ण सराव, शिस्तबद्ध खेळ आणि आत्मविश्वासाच्या जोरावर प्रतिस्पर्ध्यांना कडवी झुंज देत उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली. त्यांच्या या यशाबद्दल दिंडोरी तालुक्यासह नाशिक जिल्ह्यातून कौतुक होत आहे. या यशामागे त्यांचे वडील डॉ. प्रशांत पिंगळ व आई डॉ. गौरी पिंगळ यांचे प्रोत्साहन, मार्गदर्शन आणि पाठबळ महत्त्वाचे ठरले आहे. प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या मेहनतीचे हे फलित असल्याची भावना व्यक्त होत आहे.शाहू पिंगळ यांच्या यशाबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवर, क्रीडाप्रेमी, शिक्षक, मित्रपरिवार व नागरिकांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande