बीडमध्ये जवळपास 8 लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त
बीड, 13 जुलै (हिं.स.)गेवराई तालुक्यातील जातेगाव येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकाने धडक कारवाई करत तब्बल ₹7,75,540 किमतीचा प्रतिबंधित गुटखा जप्त केला आहे. गुप्त बातमीदाराच्या माहितीवरून ही कारवाई करण्यात आली असून आरोपी अमोल महादेवराव धोंडरे य
Q


बीड, 13 जुलै (हिं.स.)गेवराई तालुक्यातील जातेगाव येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकाने धडक कारवाई करत तब्बल ₹7,75,540 किमतीचा प्रतिबंधित गुटखा जप्त केला आहे. गुप्त बातमीदाराच्या माहितीवरून ही कारवाई करण्यात आली असून आरोपी अमोल महादेवराव धोंडरे याच्याविरुद्ध तलवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कार्यवाही पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत अपर पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. शासकीय बंदी असूनही बीड जिल्ह्याच्या ग्रामीण व शहरी भागात गुटख्याची खुलेआम विक्री सुरूच आहे. तरुणाईच्या आरोग्याशी खेळणाऱ्या या छुप्या गुटखा वाहतुकीवर आणि विक्रेत्यांवर आता कायमचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande