
नाशिक, 13 जुलै (हिं.स.) नाशिकची सुवर्णकन्या श्रावणी सांगळेने चीनमधील ऑर्डोस येथे झालेल्या पहिल्याआशियाई२३ वर्षे आतील ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप २०२६ मध्येदोन सुवर्ण पदकेआणि एक कास्य पदक अश्या एकूण ३पदकांची कमाई करून ऐतिहासिक कामगिरी केली आहे.मिश्र (मिक्स्ड)४x४०० मीटर रिलेया प्रकारात भारताच्या संघाने सुवर्णपदक पटकावले. अंतिम फेरीत भारतीय संघ चीनच्या मागे होता. मात्र शेवटच्या (अँकर)लेगमध्येश्रावणीने अफाट वेगाने चीनच्या धावपटूला मागे टाकले. आणि भारताच्या या सुवर्णपदकासाठी महत्वाची भूमिका पार पडली. अस्तिक प्रधान, सँड्रामोल साबू, सेतू मिश्रा आणि श्रावणी सांगळे यांचा समावेश असलेल्या भारतीय संघाने ३:१८.६४ सेकंद वेळेसह सुवर्ण जिंकले.
भारताने चीनचा अवघ्या ०.१० सेकंदांनी पराभव केला. या स्पर्धेच्या इतिहासातील हे भारताचे पहिले सुवर्णपदक आहे.त्यानंतर महिलांच्या ४०० मीटर अडथळाशर्यतीत श्रावणीने ५८.०९ सेकंद अशी तिची सर्वोत्तम (Lifetime Best) वेळ नोंदवतवैयक्तिक कांस्यपदक पटकावले. त्यानंतर महिलांच्या ४x४०० मीटर रिलेप्रकारात भारताच्या संघाने सुवर्णपदकाचा वेध घेतला. यामध्येही श्रावणीने मोलाचे योगदान दिले.
या तीन पदकासह श्रावणीने मानाच्या या स्पर्धेत पदकांची हॅट्रिक साधली आहे. याआधी ॲथलेटिक्समध्ये नाशिकच्या खेळाडूंचा लांब पल्याच्या शर्यतीत दबदबा होता. आता श्रावणीच्या माध्यमातून नाशिकमध्ये कमी पल्याच्या धावण्याच्या प्रकारातही वर्चस्व निर्माण होत आहे ही अभिमानाची बाब आहे. श्रावणी गेल्या अनेक वर्षांपासून नाशिकच्या व्हि.डि.के स्पोर्ट्स फाउंडेशनमध्ये आंतरराष्ट्रीय अथलेटिक्स प्रशिक्षक वैजनाथ काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहे. या गुणवान खेळाडूचे आणि तिचेप्रशिक्षक वैजनाथ काळे यांचेसर्वत्र अभिनंदन होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV