कमकुवत सुरुवातीनंतर खरेदीच्या जोरावर शेअर बाजाराची दमदार पुनरागमन
नवी दिल्ली, 13 जुलै (हिं.स.)। पश्चिम आशियातील वाढत्या तणावाचा परिणाम जागतिक शेअर बाजारांप्रमाणेच भारतीय शेअर बाजारावरही सोमवारी दिसून आला. दिवसाच्या सुरुवातीला सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही प्रमुख निर्देशांकांवर मोठा दबाव होता. मात्र खालच्या स्तरा
Stock Market Closing


नवी दिल्ली, 13 जुलै (हिं.स.)। पश्चिम आशियातील वाढत्या तणावाचा परिणाम जागतिक शेअर बाजारांप्रमाणेच भारतीय शेअर बाजारावरही सोमवारी दिसून आला. दिवसाच्या सुरुवातीला सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही प्रमुख निर्देशांकांवर मोठा दबाव होता. मात्र खालच्या स्तरावर गुंतवणूकदारांनी केलेल्या व्हॅल्यू बायिंग, आयटी क्षेत्रातील जोरदार खरेदी आणि परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांच्या लिवालीमुळे बाजाराने दणक्यात पुनरागमन केले. दिवसअखेर दोन्ही निर्देशांक जवळपास सपाट पातळीवर किरकोळ वाढीसह बंद झाले, तर गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे १.१० लाख कोटी रुपयांची भर पडली.

व्यवहाराच्या सुरुवातीला सेन्सेक्स ६०६.०४ अंकांनी घसरून ७६,९६३.३५ वर उघडला आणि काही वेळातच तो ७६,८५७.४३ या दिवसातील नीचांकी पातळीवर पोहोचला. त्यानंतर आयटी क्षेत्रातील समभागांमध्ये मोठ्या प्रमाणावर खरेदी सुरू झाली. परदेशी गुंतवणूकदारांनीही आयटी समभागांमध्ये लिवाली वाढवल्याने बाजाराला बळ मिळाले. यामुळे सेन्सेक्सने नीचांकी पातळीवरून तब्बल ९३१.८६ अंकांची उसळी घेतली. दिवसअखेर काही प्रमाणात नफा वसुली झाल्याने निर्देशांक वरच्या पातळीवरून घसरला, तरीही ४७.०१ अंकांच्या वाढीसह ७७,६१६.४० वर बंद झाला.

निफ्टीचीही सुरुवात कमकुवत झाली होती. तो १६७.५० अंकांच्या घसरणीसह २४,०३९.४० वर उघडला आणि लवकरच २४,०००.२० या नीचांकी पातळीवर पोहोचला. त्यानंतर खरेदीचा जोर वाढल्यामुळे निफ्टीने २५९.६० अंकांची जोरदार झेप घेतली. दिवसाच्या शेवटी इंट्रा-डे सेटलमेंटमुळे काही विक्री झाली, तरीही निफ्टी ४.१० अंकांच्या किरकोळ वाढीसह २४,२११ वर बंद झाला.

आयटी क्षेत्रातील समभागांनी बाजाराला मोठा आधार दिला. निफ्टी आयटी इंडेक्स ३.५९ टक्क्यांच्या वाढीसह बंद झाला. याशिवाय बँकिंग, ऑटोमोबाईल, कन्झ्युमर ड्युरेबल्स, पब्लिक सेक्टर एंटरप्रायझेस तसेच ऑइल अँड गॅस क्षेत्रातही चांगली तेजी दिसून आली. दुसरीकडे एफएमसीजी, कॅपिटल गुड्स, हेल्थकेअर, मेटल, रिअल्टी, इन्फ्रास्ट्रक्चर आणि एनर्जी क्षेत्रातील समभागांवर विक्रीचा दबाव कायम राहिला.

बीएसईवर दिवसभरात ४,५९२ समभागांमध्ये व्यवहार झाले. त्यापैकी २,३३५ समभाग वाढीसह, तर २,०६८ समभाग घसरणीसह बंद झाले. एनएसईवर २,९९५ समभागांमध्ये व्यवहार झाले. त्यापैकी १,५३५ समभाग वाढले, तर १,४६० समभाग घसरले. आयटी क्षेत्रातील तेजीनंतर बीएसईवरील सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण मार्केट कॅपिटलायझेशन ४८२.४० लाख कोटी रुपयांवर पोहोचले. त्यामुळे एका दिवसात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे १.१० लाख कोटी रुपयांची वाढ झाली.

दिवसातील प्रमुख वाढणाऱ्या समभागांमध्ये टीसीएस, एचसीएल टेक्नॉलॉजी, टेक महिंद्रा, इन्फोसिस आणि बजाज ऑटो यांचा समावेश होता. तर ग्रासिम इंडस्ट्रीज, टाटा स्टील, नेस्ले, इंटरग्लोब एव्हिएशन आणि एटरनल या समभागांमध्ये सर्वाधिक घसरण नोंदवली गेली. बाजारातील सुरुवातीच्या भीतीनंतर झालेल्या दमदार पुनरागमनामुळे गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास पुन्हा मजबूत झाल्याचे चित्र दिसून आले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande