शुभमन गिलला आयसीसी 'प्लेअर ऑफ द मंथ' पुरस्कारासाठी नामांकन
नवी दिल्ली, 13 जुलै (हिं.स.) भारतीय कर्णधार शुभमन गिल, बांगलादेशी अष्टपैलू मोसादेक होसेन आणि न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज नॅथन स्मिथ यांच्यासह, जून महिन्यासाठीच्या आयसीसी ''प्लेअर ऑफ द मंथ'' पुरस्कारासाठी नामांकित झाले आहेत. अफगाणिस्तानविरुद्धच्या
शुभमन गिल


नवी दिल्ली, 13 जुलै (हिं.स.) भारतीय कर्णधार शुभमन गिल, बांगलादेशी अष्टपैलू मोसादेक होसेन आणि न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज नॅथन स्मिथ यांच्यासह, जून महिन्यासाठीच्या आयसीसी 'प्लेअर ऑफ द मंथ' पुरस्कारासाठी नामांकित झाले आहेत. अफगाणिस्तानविरुद्धच्या भारताच्या घरच्या मालिकेत गिल जबरदस्त फॉर्मात होता आणि त्याने कसोटी व एकदिवसीय या दोन्ही प्रकारांमध्ये संघाचे नेतृत्व केले. गिलने या महिन्याची सुरुवात न्यू चंदीगड येथे झालेल्या एकमेव कसोटी सामन्यात भारताच्या डावाने मिळवलेल्या विजयादरम्यान शानदार १२६ धावांची खेळी करून केली होती. त्याचे ११ वे कसोटी शतक होते.

गिलने एकदिवसीय मालिकेतही आपला प्रभावी फॉर्म कायम ठेवला आणि केवळ दोन डावांमध्ये २३८ धावा केल्या. धरमशाला येथील पहिल्या एकदिवसीय सामन्यात नाबाद ८४ धावा केल्यानंतर, गिलने लखनौमध्ये १५४ धावा केल्या. डावादरम्यान तीव्र पेटके येऊनही, गिलने वेगाने धावा करून भारताचा विजय निश्चित केला. त्याच्या या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्याला 'प्लेअर ऑफ द सीरिज' म्हणून गौरविण्यात आले होेते. भारताने ही मालिका ३-० ने जिंकली होती.

दरम्यान, बांगलादेशच्या मोसादेक होसेनने चार वर्षांच्या विश्रांतीनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये उल्लेखनीय पुनरागमन केले. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ऐतिहासिक २-१ अशा एकदिवसीय मालिका विजयात या अष्टपैलू क्रिकेटपटूला मालिकावीर म्हणून गौरविण्यात आले. पहिल्या सामन्यात होसेनने नाबाद ८६ धावा केल्या आणि दोन बळी घेतले. या मालिकेत १५७ धावांसह तो आपल्या संघाचा सर्वाधिक धावा करणारा क्रिकेटपटू होता.

दरम्यान, इंग्लंडमध्ये न्यूझीलंडच्या कमकुवत वेगवान गोलंदाजीचे नेतृत्व करत २-१ असा संस्मरणीय कसोटी मालिका विजय मिळवून दिल्याबद्दल स्मिथला पुरस्कृत करण्यात आले. स्मिथने या मालिकेत सर्वाधिक १६ बळी घेतले, ज्यात लॉर्ड्सवर ७० धावांत सहा बळींचा समावेश होता. त्याला मालिकावीर म्हणून गौरविण्यात आले होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande