इराणमध्ये नवे सत्ताकेंद्र? मोजतबा खामेनेईंवरील चर्चेदरम्यान अली खोमेनी पुढे
तेहरान, 14 जुलै (हिं.स.)। इराणमध्ये मोजतबा खामेनेई यांच्याबाबतच्या शंकांच्या पार्श्वभूमीवर मोठे राजकीय बदल दिसून येत आहेत. मध्यपूर्वेतील या देशात नव्या सत्ताकेंद्राचा उदय होत असल्याचे मानले जात आहे. इस्लामी क्रांतीचे जनक अयातुल्ला खोमेनी यांचा नातू
इराणमध्ये नवे सत्ताकेंद्र? मोजतबा खामेनेईंवरील चर्चेदरम्यान अली खोमेनी पुढे


तेहरान, 14 जुलै (हिं.स.)। इराणमध्ये मोजतबा खामेनेई यांच्याबाबतच्या शंकांच्या पार्श्वभूमीवर मोठे राजकीय बदल दिसून येत आहेत. मध्यपूर्वेतील या देशात नव्या सत्ताकेंद्राचा उदय होत असल्याचे मानले जात आहे. इस्लामी क्रांतीचे जनक अयातुल्ला खोमेनी यांचा नातू अली खोमेनी यांना इस्लामिक फ्रंट (जबेह पायदारी) यांचा पाठिंबा मिळाल्याचे सांगितले जात आहे.

अली खोमेनी हे अत्यंत कट्टरपंथी गटाशी संबंधित मानले जातात. त्यांनी कोम येथे झालेल्या सभेत अमेरिकेशी कोणताही करार न करण्याची भूमिका जाहीर केली. हार्डलाइनर नेतृत्वामध्ये त्यांनी आपला प्रभाव अधिक मजबूत केला असून, इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) देखील त्यांच्या समर्थनात आल्याचे म्हटले जात आहे. यामुळे इराण खाडीतील देशांमध्ये आपला प्रभाव वाढवण्याचा प्रयत्न करू शकतो. तथाकथित “गल्फ प्लॅन” अंतर्गत खाडी देशांना अमेरिकेच्या प्रभावक्षेत्रातून बाहेर काढून इराणच्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो.

या घडामोडींमुळे इराणमधील सुधारवादी गटांना आपला राजकीय अजेंडा पुढे नेणे अधिक कठीण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच हिजबुल्लाह, हमास आणि हुथी यांसारख्या संघटनांना अधिक लष्करी मदत दिली जाऊ शकते, असेही म्हटले जात आहे.

दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी होर्मुज सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांकडून २० टक्के टोल आकारण्याचा आणि त्यांना सुरक्षा पुरवण्याचा प्रस्ताव मांडल्याचे वृत्त आहे. त्यांनी म्हटले की, “होर्मुज सामुद्रधुनी खुली आहे आणि इराणसोबत किंवा त्याशिवायही ती खुली राहील. आम्ही इराणवरील नाकेबंदी पुन्हा लागू करत आहोत. या व्यवस्थेमुळे केवळ इराणी जहाजे किंवा इराणशी संबंधित ग्राहकांच्या जहाजांच्या येण्या-जाण्यावर निर्बंध असतील. इतर सर्व देशांना सामुद्रधुनीचा मुक्त आणि निष्पक्ष वापर करता येईल.”

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande