अमेरिका-इराण संघर्ष अधिक तीव्र; अमेरिकेच्या कारवाईला इराणचे प्रत्युत्तर
तेहरान , 14 जुलै (हिं.स.)।अमेरिकेने मंगळवारी पहाटे इराणवर पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर हवाई हल्ले सुरू केले.अमेरिकन सेंट्रल कमांड (सेंटकॉम) यांच्या माहितीनुसार, या हल्ल्यांचा उद्देश इराणची लष्करी क्षमता कमकुवत करणे आणि होर्मुझ सामुद्रधुनीतून प्रवास
इराणवरील अमेरिकेचे हल्ले दुसऱ्या दिवशीही सुरूच; हवाई हल्ल्यांत दोन जणांचा मृत्यू


तेहरान , 14 जुलै (हिं.स.)।अमेरिकेने मंगळवारी पहाटे इराणवर पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर हवाई हल्ले सुरू केले.अमेरिकन सेंट्रल कमांड (सेंटकॉम) यांच्या माहितीनुसार, या हल्ल्यांचा उद्देश इराणची लष्करी क्षमता कमकुवत करणे आणि होर्मुझ सामुद्रधुनीतून प्रवास करणाऱ्या व्यापारी जहाजांची सुरक्षा सुनिश्चित करणे हा आहे.

अमेरिकन सेंट्रल कमांड (सेंटकॉम) यांनी सांगितले की, कमांडर-इन-चीफ यांच्या निर्देशानुसार अमेरिकन सैन्याने आज सायंकाळी ४:४५ वाजता (ईस्टर्न टाइम) इराणविरुद्ध सलग तिसऱ्या दिवशी हल्ले सुरू केले आहेत.अमेरिकन लष्कराच्या सेंट्रल कमांडने सांगितले की, अबू मुसा, बंदर अब्बास, बुशेहर, चाबहार, जस्क आणि कोनारक परिसरात हवाई हल्ले करण्यात आले. या कारवायांमध्ये इराणच्या किनारी संरक्षण यंत्रणा, क्षेपणास्त्र व ड्रोन तळ तसेच सागरी लष्करी क्षमतांना लक्ष्य करण्यात आले. अमेरिकन सैन्याच्या मते, या कारवायांचा उद्देश इराणी सैन्यदलांना मोठे नुकसान पोहोचवणे तसेच होर्मुझ सामुद्रधुनीत निरपराध नागरिक आणि व्यापारी जहाजांवर हल्ला करण्याची त्यांची क्षमता कमकुवत करणे हा आहे. या हल्ल्यांपूर्वी सेंटकॉमने कमांडर-इन-चीफ यांच्या आदेशानुसार १४ जुलै रोजी सायंकाळी ४ वाजल्यापासून (ईस्टर्न टाइम) इराणी बंदरांची सागरी नाकेबंदी पुन्हा सुरू करण्याची घोषणा केली होती.

ट्रम्प यांनी सांगितले की, अमेरिका “अत्यंत जोरदार हल्ले” करत असून ही मोहीम पुढेही सुरू राहणार आहे. त्यांनी असेही म्हटले की, सुरक्षित सागरी मार्ग उपलब्ध करून देण्यासाठी होणारा खर्च आता या मार्गाचा वापर करणाऱ्या इतर देशांच्या जहाजांकडून वसूल केला जाईल. दरम्यान, अमेरिकन हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स (आयआरजीसी) ने बहरीनमध्ये असलेल्या अमेरिकन नौदलाच्या फिफ्थ फ्लीट मुख्यालयावर क्षेपणास्त्र आणि ड्रोनद्वारे हल्ला केल्याचा दावा केला आहे.

आयआरजीसीच्या म्हणण्यानुसार, या हल्ल्यात नौदल तळावरील इंधन साठवण केंद्राला आग लागली. तसेच अमेरिकन पॅट्रियट एअर डिफेन्स रडार, फ्लीटचे एअर कंट्रोल रडार, सी-रॅम (C-RAM) अर्ली वॉर्निंग रडार प्रणाली आणि मानवरहित पृष्ठभागीय नौकांच्या (USVs) नियंत्रण व देखरेख केंद्रांनाही लक्ष्य करून नष्ट करण्यात आले. आयआरजीसीने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, अमेरिकन हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून ही कारवाई करण्यात आली असून “प्रतिशोधात्मक मोहीम अद्याप सुरू आहे.” मात्र, अमेरिकन सैन्य किंवा बहरीन सरकारकडून या दाव्यांची अद्याप अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नाही.

याचदरम्यान, इराणने असा दावा केला आहे की जॉर्डनमधील अमेरिकन हवाई तळावर लक्ष्य साधण्यात त्यांना यश आले आहे. तसेच, जॉर्डनने आपल्या देशातील अमेरिकन लष्करी तळ हटवावेत, असे आवाहनही इराणने केले आहे. इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे, “आमची तुमच्या देशाशी कोणतीही शत्रुत्वाची भावना नाही. आम्ही तुमच्यासारख्या सज्जन लोकांचा आदर करतो, जे पॅलेस्टाईनमध्ये सुरू असलेल्या अत्याचारांना इतर कोणत्याही देशापेक्षा अधिक चांगल्या प्रकारे समजून घेतात.”

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande