चंद्रपूरः पळसगाव वनक्षेत्रात एका अवयस्क वाघाचा मृत्यू
चंद्रपूर, 14 जुलै (हिं.स.)। ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील पळसगाव वनक्षेत्रातील लोकवस्तीच्या परिसरात आज एका वाघास बेशुद्ध करून जेरबंद केले जात असताना त्याचा मृत्यू झाला. मागील महिन्यात या उपप्रौढ (Sub-adult) वाघाच्या हल्ल्यात एका नागरिकाचा मृत्
चंद्रपूरः पळसगाव वनक्षेत्रात एका अवयस्क वाघाचा मृत्यू


चंद्रपूर, 14 जुलै (हिं.स.)।

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील पळसगाव वनक्षेत्रातील लोकवस्तीच्या परिसरात आज एका वाघास बेशुद्ध करून जेरबंद केले जात असताना त्याचा मृत्यू झाला. मागील महिन्यात या उपप्रौढ (Sub-adult) वाघाच्या हल्ल्यात एका नागरिकाचा मृत्यू झाला होता.

28 जून रोजी चोरगाव परिसरात शिडामे यांच्या मृत्यूस T 202F S2 हा उपप्रौढ वाघ कारणीभूत ठरला होता. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या जलद प्रतिसाद दलाने (RRT) दिनांक 4 जुुलै रोजी त्याला बेशुद्ध करून यशस्वीरित्या पकडले होते.

त्यानंतर नियमानुसार सदर वाघास ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या गाभा क्षेत्रात सोडण्यात आले होते. मात्र, त्यानंतर या वाघाने कोणत्याही वन्यप्राण्याची शिकार न करता पुन्हा पळसगाव वनक्षेत्रातील लोकवस्तीच्या परिसरात वावर सुरू केल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे मागील तीन दिवसांपासून संबंधित वाघाच्या हालचालींवर वन विभागामार्फत सातत्याने लक्ष ठेवण्यात येत होते.

आज संबंधित वाघास आमिष बांधून पकडण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार वाघास बेशुद्ध करण्याची कार्यवाही सुरू असताना अंदाजे दुपारी ३:४५ ते ४:०० या वेळेदरम्यान त्याचा मृत्यू झाला. सदर वाघाचे शवविच्छेदन करण्यात येणार असून त्याचा सविस्तर अहवाल वरिष्ठ कार्यालयास सादर करण्यात येईल.

---------------

हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव


 rajesh pande