
बीड, 15 जुलै (हिं.स.)।
शिरसाळा (ता. परळी) येथे GVT स्वयंसेवी संस्थेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या तलाव खोलीकरण, तलावाशेजारी निर्मिती तसेच नियोजित उपक्रमाच्या भूमिपूजन व उद्घाटनाचा कार्यक्रम मा. जिल्हाधिकारी, बीड यांच्या शुभहस्ते उत्साहात संपन्न झाला.
या उपक्रमांतर्गत शिरसाळा येथील ४ तलावांचे खोलीकरण करण्यात येत असून, तलाव परिसर सुशोभित करण्यासाठी व नागरिकांच्या आरोग्यदायी जीवनशैलीला प्रोत्साहन देण्यासाठी वॉकिंग ट्रॅकची निर्मितीही सुरू आहे. यासोबतच मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संकल्पही करण्यात आला आहे.
जलसंवर्धन, पर्यावरण संरक्षण आणि ग्रामविकासासाठी GVT चा हा उपक्रम निश्चितच प्रेरणादायी असून, शिरसाळा परिसराच्या शाश्वत विकासात मोलाची भर घालणारा ठरेल.
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis