अमरावती : तिवसा येथे ३९ लाखांचा गुटखा जप्त
अमरावती, 14 जुलै (हिं.स.)।ग्रामीण भागातील गुटखा तस्करीला ब्रेक बसलेला नाही. तिवसाहद्दीत स्थानिक गुन्हे शाखेने ३९ लाखांचा गुटखा व १६ लाखांचा ट्रक, असा एकूण ५५ लाखांचा मुद्देमाल जप्त करून दोघांना अटक केली आहे. गुन्हे शाखेने ही कारवाई अमरावती ते नागपू
तिवसा येथे ३९ लाखांचा गुटखा जप्त


अमरावती, 14 जुलै (हिं.स.)।ग्रामीण भागातील गुटखा तस्करीला ब्रेक बसलेला नाही. तिवसाहद्दीत स्थानिक गुन्हे शाखेने ३९ लाखांचा गुटखा व १६ लाखांचा ट्रक, असा एकूण ५५ लाखांचा मुद्देमाल जप्त करून दोघांना अटक केली आहे. गुन्हे शाखेने ही कारवाई अमरावती ते नागपूर महामार्गावर तिवसाहद्दीत केली. अब्दुल रफीक अब्दुल शब्बीर (वय ३५, रा. महेंद्र कॉलनी) व अर्शद खान रहमत खान (वय ३०, रा. पठाण चौक, अमरावती), अशी अटक दोघांची नावे असल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अशोक लांडे यांनी दिली.

गुन्हे शाखेने महामार्गावर एमएच ०१ सीव्ही ६२८२ क्रमांकाचा ट्रक थांबवून तपासणी केली. त्यामध्ये १३० पोती गुटखा व पानमसाल्याचा माल आढळून आला होता. गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक सागर हटवार, रवींद्र बावणे, बळवंत दाभणे, भूषण पेठे, नीलेश डांगोरे, यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. अटक दोघेही तिवसा पोलिसांच्या कोठडीत आहेत. हा माल कुणाचा आहे, याचा उलगडा झालेला नाही.

-----------------------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande