
अमरावती, 15 जुलै (हिं.स.)। सफाई कामगारांच्या पुनर्वसनाकरिता आवश्यक कार्यवाही करण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते `नॅशनल ऍक्शन फॉर मेकॅनाइज्ड सॅनिटेशन इकोसिस्टम` अर्थात ‘नमस्ते’ या उपक्रम राबविला जात आहे यातून सफाई कामगारांचे जीवनमान उंचविले जाणार असल्याचे मत आमदार प्रताप अडसड यांनी व्यक्त केले.
येथील नगर परिषदेमध्ये नमस्ते योजनेचा शुभारंभ कार्यशाळा आयोजित करून करण्यात आला. यावेळी अध्यक्षस्थानी आ. प्रताप अडसड तर नगराध्यक्ष डॉ अर्चनाताई अडसड रोठे, उपाध्यक्ष गिरीश मुंदडा, बांधकाम सभापती मंजिरी भोगे यांच्या सह आदींची उपस्थिती होती.
या कार्यशाळेत सिवर - सेप्टिक टँकची सफाई करताना कर्मचाऱ्यांनी कशाप्रकारे सुरक्षेची काळजी घ्यावी, कोणती उपकरणे वापरावीत, स्वतःच्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी, आदी प्रमुख मुद्द्यांवर मार्गदर्शन करण्यात आले. नगर परिषद व ग्रामीण रुग्णालय यांच्या वतीने सफाई कामगारांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन देखील केले होते. याचा लाभ उपस्थित सफाई कामगारांनी घेतला यावेळी गणेशासह विविध साहित्याचे वितरण करण्यात आले या कार्यशाळेला सर्वच सफाई कामगारांची उपस्थिती होती.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी