
नवी दिल्ली, १९ जुलै (हिं.स.)। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी भारताची स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूचे जपान ओपन २०२६ जिंकल्याबद्दल अभिनंदन केले. पंतप्रधान मोदींनी एक्सवर लिहिले, भारतीय बॅडमिंटनसाठी एक ऐतिहासिक कामगिरी! जपान ओपन २०२६ जिंकल्याबद्दल पीव्ही सिंधूचे अभिनंदन. संपूर्ण स्पर्धेत तिचा दृढनिश्चय आणि उत्कृष्ट कौशल्ये दिसून आली. ही कामगिरी अधिक विशेष आहे, कारण हे विजेतेपद जिंकणारी ती पहिली भारतीय बॅडमिंटनपटू आहे. यामुळे देशभरातील असंख्य तरुण खेळाडूंना खेळण्यासाठी आणि उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी प्रेरणा मिळेल.
भारताची स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने आज जपानच्या अकाने यामागुचीला सरळ गेममध्ये पराभूत करून जपान ओपन २०२६ महिला एकेरीचे विजेतेपद पटकावले. या विजयासह, सिंधू जपान ओपन जिंकणारी पहिली भारतीय बॅडमिंटनपटू ठरली आहे. अंतिम सामन्यात, सिंधूने आक्रमक स्मॅश, अचूक ड्रॉप शॉट्स आणि उत्कृष्ट कोर्ट कव्हरेजचे प्रदर्शन करत यजमान खेळाडू यामागुचीचा अवघ्या ५० मिनिटांत २१-१७, २१-१७ असा पराभव केला. तसेच तिने आपल्या कारकिर्दीतील पहिले BWF सुपर ७५० विजेतेपदही पटकावले.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे