लॉस एंजेलिस नाइट रायडर्सला पहिल्यांदाच मेजर लीग क्रिकेटचे विजेतेपद
ऑकलंड, 19 जुलै (हिं.स.)लॉस एंजेलिस नाइट रायडर्सने ओकलंडमध्ये वॉशिंग्टन फ्रीडम्सचा एका धावेने पराभव करून मेजर लीग क्रिकेट २०२६ चे विजेतेपद पटकावले. हा नाइट रायडर्सचा पहिला विजय होता. वेस्ट इंडिजचे दिग्गज सुनील नरेन आणि जेसन होल्डर यांनी या विजयात मह
लॉस एंजेलिस नाइट रायडर्स


ऑकलंड, 19 जुलै (हिं.स.)लॉस एंजेलिस नाइट रायडर्सने ओकलंडमध्ये वॉशिंग्टन फ्रीडम्सचा एका धावेने पराभव करून मेजर लीग क्रिकेट २०२६ चे विजेतेपद पटकावले. हा नाइट रायडर्सचा पहिला विजय होता. वेस्ट इंडिजचे दिग्गज सुनील नरेन आणि जेसन होल्डर यांनी या विजयात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

प्रथम फलंदाजी करताना, नाइट रायडर्सने १९.४ षटकांत १६४ धावा केल्या. फ्रीडम्सला २० षटकांत नऊ गडी गमावून केवळ १६३ धावाच करता आल्या. नरेन आणि होल्डर यांनी प्रत्येकी तीन बळी घेऊन फ्रीडम्सच्या प्रमुख फलंदाजांना झटपट बाद केले.

१६५ धावांचे लक्ष्य गाठताना, नरेनने फ्रीडम्सला सुरुवातीलाच धक्का दिला. तिसऱ्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर, केवळ नऊ धावा करून मिचेल ओवेनला नरेनने बाद केले. पाचव्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर, केवळ सात धावा करून रचिन रवींद्रही तंबूत परतला. नरेनने स्टीव्ह स्मिथला आपला पुढचा बळी बनवले, जो आठ धावांवर बाद झाला. फ्रीडमने अवघ्या २९ धावांत तीन गडी गमावले होते.

त्यानंतर निखिल चौधरी आणि आंद्रेस गॉस यांनी डाव काहीसा सावरला. त्यांनी संघाची धावसंख्या ९४ पर्यंत नेली होती. याचवेळी निखिल बाद झाला. होल्डरने २५ धावा करून त्याची विकेट घेतली. त्यानंतर होल्डरने बेन ड्वार्शुइसला बाद करून फ्रीडमला पाचवा धक्का दिला. तो फक्त एक धावच करू शकला. होल्डरने आंद्रेसलाही बाद केले. या फलंदाजाने दोन चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने ३५ चेंडूंमध्ये ४० धावा केल्या होत्या.

शेवटी एकट्याने झुंज देणाऱ्या ऑब्स पिनारने संघाला विजयाकडे नेण्याचा प्रयत्न केला, पण शेवटच्या षटकांमध्ये संघ एका धावेने मागे पडला. ऑब्सने तीन चौकार आणि पाच षटकारांच्या मदतीने २४ चेंडूंमध्ये ५३ धावा केल्या होत्या. जर शेवटच्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर त्याची विकेट पडली नसती, तर फ्रीडमने सामना जिंकला असता.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande