सोनम वांगचुक यांच्या आवाहनानंतर अभिजीत दीपके यांच्यासह एआयएसए कार्यकर्त्यांचेही उपोषण मागे
नवी दिल्ली , 20 जुलै (हिं.स.)।कॉकरोच जनता पार्टी (सीजेपी )चे संस्थापक अभिजीत दीपके यांनी कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या विनंतीवरून आपले अनिश्चितकालीन उपोषण मागे घेतले. सध्या सोनम वांगचुक हे सफदरजंग रुग्णालयात दाखल आहेत. प्रतिनिधीमंडळाने त्यांना सं
सोनम वांगचुक यांच्या आवाहनानंतर अभिजीत दीपके यांच्यासह एआयएसए कार्यकर्त्यांचेही उपोषण मागे


नवी दिल्ली , 20 जुलै (हिं.स.)।कॉकरोच जनता पार्टी (सीजेपी )चे संस्थापक अभिजीत दीपके यांनी कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या विनंतीवरून आपले अनिश्चितकालीन उपोषण मागे घेतले. सध्या सोनम वांगचुक हे सफदरजंग रुग्णालयात दाखल आहेत. प्रतिनिधीमंडळाने त्यांना संसदेत तसेच जनआंदोलनांच्या माध्यमातून हा लढा पुढे सुरू ठेवण्याचे आवाहन केले होते. दरम्यान, एआयएसएचे कार्यकर्ते नेहा, मनीष आणि आमीन यांनीही आपले उपोषण संपवले.

प्रतिनिधीमंडळाने विद्यार्थ्यांना आश्वासन दिले की त्यांच्या मागण्या आगामी पावसाळी अधिवेशनात संसदेत मांडल्या जातील. तसेच राजकीय आणि जनआंदोलनांच्या माध्यमातून त्यावर पुढील पाठपुरावा केला जाईल. या प्रतिनिधीमंडळात राज्यसभा खासदार मनोज झा आणि सीपीआय(एम)चे खासदार अमरा राम यांचा समावेश होता. सीपीआय(एमएल) लिबरेशनचे महासचिव दीपांकर भट्टाचार्य आणि राजाराम सिंह हेही उपस्थित होते.

सामाजिक कार्यकर्ते योगेंद्र यादव, ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण आणि शिक्षणतज्ज्ञ अतुल सूद हे देखील प्रतिनिधीमंडळाचा भाग होते. अभिनेते प्रकाश राज आणि अभिनेत्री शबाना आझमी यांनीही विद्यार्थ्यांची भेट घेतली. विद्यार्थ्यांना उपोषण मागे घेण्याचे आवाहन करताना योगेंद्र यादव म्हणाले की, हे उपोषण मोडणे नसून संघर्षाच्या या विशिष्ट टप्प्याचा आणि पद्धतीचा समारोप आहे.

एआयएसएच्या माहितीनुसार, 23 दिवसांच्या उपोषणादरम्यान तिन्ही कार्यकर्त्यांचे वजन 12 टक्क्यांहून अधिक घटले होते. धोकादायकरीत्या कमी झालेली रक्तातील साखरेची पातळी आणि गंभीर आरोग्य समस्यांचा सामना करूनही ते आपल्या भूमिकेवर ठाम राहिले.

एआयएसएचे कार्यकर्ते 28 जूनपासून जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या व्यापक आंदोलनाचा भाग म्हणून अनिश्चितकालीन उपोषण करत होते. या आंदोलनातून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत होती. तसेच परीक्षांमधील कथित गैरव्यवहारांची न्यायालयीन चौकशी आणि शिक्षण व्यवस्थेत व्यापक सुधारणा करण्याची मागणीही करण्यात आली होती.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande