
बीड, 20 जुलै (हिं.स.)। विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी, सोनम वांगचूक यांच्यावरील कारवाईचा निषेध तसेच नीट आणि टीईटी परीक्षांमधील गैरव्यवहाराच्या विरोधात आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय, बीड येथे आयोजित राज्यव्यापी धरणे आंदोलनाला उत्साहात सुरुवात झाली.
विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्यांना जाब विचारण्यासाठी आणि शिक्षण व्यवस्थेत पारदर्शकता व न्याय मिळवून देण्यासाठी हा लढा सुरू असून, विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कायम ठामपणे उभी आहे. असे विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी हा संघर्ष शेवटपर्यंत सुरू राहील असे राजेंद्र तुकाराम मस्के जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) यांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis