
बीड, 21 जुलै (हिं.स.)।महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेअंतर्गत पशुपालकांसाठी विशेष प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात २३ जुलै २०२६ रोजी शेळीपालन व मेंढीपालन प्रशिक्षण, तर २४ जुलै २०२६ रोजी दुग्धव्यवसाय प्रशिक्षण दिले जाणार आहे.
प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या सहभागी उमेदवारांना शासनमान्य प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे. पशुपालन क्षेत्रात व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या तसेच विद्यमान व्यवसाय अधिक सक्षम करण्याची इच्छा असलेल्या पशुपालकांसाठी हे प्रशिक्षण उपयुक्त ठरणार आहे.
हे प्रशिक्षण कुक्कुटपालन प्रशिक्षण केंद्र, सभागृह, मध्यवर्ती अंडी उबवणी केंद्र, खडकी, पुणे येथे सकाळी ९.०० ते सायंकाळी ५.३० या वेळेत होणार आहे.
प्रशिक्षणासाठी इच्छुकांनी ७३५०६६८८४५ या व्हॉट्सॲप क्रमांकावर आपण सहभागी होऊ इच्छित असलेल्या प्रशिक्षणाचे नाव (उदा. शेळीपालन किंवा दुग्धव्यवसाय) पाठवावे. त्यानंतर संबंधित व्हॉट्सॲप समूहाची लिंक पाठविण्यात येईल. त्या समूहात प्रशिक्षण शुल्क, अर्ज प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे व ऑनलाइन नोंदणीबाबत सविस्तर माहिती उपलब्ध करून दिली जाईल.
पशुपालन क्षेत्रात स्वावलंबी होण्यासाठी इच्छुकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis