
नांदेड, 20 जुलै (हिं.स.)। महात्मा फुले पुतळ्या समोर आय.टी.आय चौकात सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी यांना राष्ट्रवादी कॉंग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने निवेदन देण्यात आले. आपल्या मागण्यांसाठी सनदशीर मार्गाने आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवरही अशाच प्रकारे इंग्रजांकडून लाठीचार्ज केला जात होता. इंग्रजांनाही लाजवणारं हे क्रूर आणि निष्ठूर सरकार आहे. शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर लाठीचार्ज करणाऱ्या हुकूमशाही सरकारचा तीव्र निषेध करण्यात आला.
दिल्ली मध्ये संसदेवर निघालेला विराट मोर्चा सर्वार्थाने चिरडण्याचा प्रयत्न सरकारकडून सुरू आहे. मात्र लोकशाहीमध्ये सर्वात शक्तिशाली रस्त्यावर उतरलेला सर्वसामान्य माणूस असतो हे आज सरकारच्या लक्षात आल्याशिवाय राहणार नाही. २० दिवस अन्नत्याग करून देखील शासनाने या आंदोलनाची दखल तर घेतली नाहीच मात्र सोनम वांगचूक यांना हुकुमशाही पद्धतीने उचलण्यात आले. आपली चूक सरकार मान्य करत नाहीच मात्र उलट लोकशाही पद्धतीने आंदोलन देखील करून दिले जात नाही. सरकारने आता तरी शहाणं व्हावं आणि अकार्यक्षम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा तत्काळ राजीनामा घ्यावा, असे निवेदनात म्हटले आहे.
-------------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis