
नवी दिल्ली, 20 जुलै (हिं.स.)। संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी, सोमवारी राज्यसभेच्या ९ नवनिर्वाचित सदस्यांनी सभागृहाच्या सदस्यत्वाची शपथ घेतली.यापैकी पाच सदस्यांनी हिंदीत, दोन सदस्यांनी इंग्रजीत तर दोन सदस्यांनी बंगालीत शपथ घेतली.
राज्यसभेचे सभापती सी. पी. राधाकृष्णन यांनी या नवनिर्वाचित सदस्यांना शपथ दिली. शपथ घेणाऱ्या सदस्यांमध्ये गुजरातमधील भाजपचे मुकेशभाई जे. राठवा, कर्नाटकमधील काँग्रेसचे पवन खेडा, मध्य प्रदेशातील भाजपचे महेश केवट, मेघालयमधील नॅशनल पीपल्स पार्टीचे जेम्स पांगसांग कोंगकल संगमा, मिझोरममधील खिआंगते लालटलुआंगकिमा, राजस्थानमधील भाजपचे डॉ. सतीश पूनिया तसेच पश्चिम बंगालमधील भाजपचे प्रकाश चिक बराईक, सुश्मिता देव आणि सुखेंदू शेखर रे यांचा समावेश आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule