

लंडन, 20 जुलै (हिं.स.)निवृत्तीच्या चर्चा सुरू असताना, रोहित शर्माने इंग्लंडविरुद्ध लॉर्ड्सवर झालेल्या एकदिवसीय सामन्यात शतक झळकावले. त्याने ८४ चेंडूंमध्ये शतक पूर्ण केले. आदिल रशीदच्या गोलंदाजीवर चौकार मारून रोहितने आपले ३४ वे एकदिवसीय शतक पूर्ण केले. या खेळीत ११ चौकार आणि चार षटकारांचा समावेश होता. सुरुवातीला रोहितने सावकाश खेळ केला, पण नंतर त्याने मुक्तपणे धावा केल्या. पहिल्या ५० धावा करण्यासाठी त्याने ५० चेंडू घेतले आणि त्यानंतर पुढच्या ५० धावा केवळ ३४ चेंडूंमध्ये पूर्ण केल्या.
इंग्लंडमधील हे रोहितचे आठवे शतक होते. इंग्लंडमध्ये कोणत्याही परदेशी फलंदाजाने केलेली ही सर्वाधिक एकदिवसीय शतके आहेत. कोणत्याही देशात एकदिवसीय क्रिकेटमध्ये परदेशी फलंदाजाने केलेल्या सर्वाधिक शतकांचा जागतिक विक्रमही त्याच्या नावावर आहे. त्याने क्विंटन डी कॉक (भारत), एबी डिव्हिलियर्स (भारत), सईद अन्वर (यूएई) आणि सचिन तेंडुलकर (यूएई) यांना मागे टाकले, ज्या सर्वांनी प्रत्येकी सात शतके केली होती.
या खेळीमुळे रोहित लॉर्ड्सवर एकदिवसीय शतक झळकावणारा पहिला भारतीय पुरुष क्रिकेटपटू ठरला. यापूर्वी, सौरव गांगुलीच्या ९० धावा या मैदानातील सर्वोच्च धावसंख्या होती. त्याने २००४ मध्ये ही कामगिरी केली होती. रोहित लॉर्ड्सवर एकदिवसीय शतक झळकावणारा सर्वात वयस्कर क्रिकेटपटू आणि भारतासाठी एकदिवसीय शतक झळकावणारा सर्वात वयस्कर क्रिकेटपटू देखील ठरला.
रोहितने ८४ चेंडूंमध्ये केलेले शतक हे लॉर्ड्सवरील तिसरे सर्वात वेगवान शतक होते. त्याने २००२ मध्ये भारताविरुद्ध मार्कस ट्रेस्कोथिकचा ८९ चेंडूंचा विक्रम मोडला होता. पण, या मैदानावर सर्वात वेगवान एकदिवसीय शतकाचा विक्रम जॉस बटलरच्या नावावर आहे, ज्याने २०१४ मध्ये येथे ६१ चेंडूंमध्ये शतक झळकावले होते. दरम्यान, होररोहित ११० चेंडूंमध्ये १३८ धावांवर बाद झाला. जेकब बेथेलने त्याची विकेट घेतली. त्याच्या खेळीत १७ चौकार आणि पाच षटकारांचा समावेश होता.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे