ब्रिटनचे नवे पंतप्रधान अँडी बर्नहॅम यांचे पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नवी दिल्ली , 21 जुलै (हिं.स.)।ब्रिटनचे पंतप्रधान म्हणून पदभार स्वीकारल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अँडी बर्नहॅम यांचे अभिनंदन केले आहे. भारत आणि ब्रिटन हे समान लोकशाही मूल्यांनी जोडलेले असून, दोन्ही देशांमध्ये विविध क्षेत्रांत मजबूत सहकार्
ब्रिटनचे नवे पंतप्रधान अँडी बर्नहॅम यांना पंतप्रधान मोदींकडून शुभेच्छा


नवी दिल्ली , 21 जुलै (हिं.स.)।ब्रिटनचे पंतप्रधान म्हणून पदभार स्वीकारल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अँडी बर्नहॅम यांचे अभिनंदन केले आहे. भारत आणि ब्रिटन हे समान लोकशाही मूल्यांनी जोडलेले असून, दोन्ही देशांमध्ये विविध क्षेत्रांत मजबूत सहकार्य असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पंतप्रधान मोदी यांनी लिहिले की, भारत आणि ब्रिटन यांच्यात व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान, संरक्षण तसेच दोन्ही देशांतील नागरिकांमधील संबंध या क्षेत्रांत व्यापक सहकार्य आहे. त्यांनी असेही नमूद केले की, याच महिन्यात सीईटीए करार लागू झाल्यानंतर भारत-ब्रिटन द्विपक्षीय भागीदारी आणखी बळकट होईल, अशी अपेक्षा आहे.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारत-ब्रिटन सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी अधिक दृढ करण्यासाठी आणि ‘व्हिजन 2035’ या सामायिक उद्दिष्टाला पुढे नेण्यासाठी अँडी बर्नहॅम यांच्यासोबत काम करण्यास ते उत्सुक आहेत.

लेबर पक्षाचे नवे नेते अँडी बर्नहॅम यांनी सोमवारी ब्रिटनच्या पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतली. “किंग ऑफ द नॉर्थ” म्हणून ओळखले जाणारे बर्नहॅम हे कीअर स्टार्मर यांच्या राजीनाम्यानंतर पंतप्रधानपदाच्या शर्यतीत आघाडीवर होते. रिफॉर्म यूके या लोकानुनयी पक्षाचा वाढता प्रभाव रोखणे हे त्यांचे प्रमुख उद्दिष्ट मानले जात आहे.

ब्रिटनमधील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर गेल्या दशकात देशाला सातवा पंतप्रधान मिळाला आहे. गेल्या शुक्रवारीच बर्नहॅम यांची लेबर पक्षाच्या नव्या नेत्यपदी निवड झाली होती. लेबर पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारी समितीच्या (NEC) अध्यक्षा शबाना महमूद यांनी लंडनमधील पक्षाच्या विशेष अधिवेशनात ही घोषणा केली. त्या म्हणाल्या, “फक्त एका खासदाराने उमेदवारी दाखल केली होती, त्यामुळे निवड प्रक्रिया सोपी ठरली.” त्यानंतर बर्नहॅम यांनी आपल्या निवडीला गेल्या 40 वर्षांतील ब्रिटनच्या राजकारणातील सर्वात मोठा बदल असे संबोधले.

अँडी बर्नहॅम यांनी देशाची व्यवस्था नव्याने उभारण्याचा आणि सरकारचे लक्ष महागाई, वाढती जीवननिर्वाहाची किंमत तसेच कमकुवत होत चाललेल्या सार्वजनिक सेवांसारख्या सामान्य नागरिकांच्या प्रश्नांवर केंद्रित करण्याचा संकल्प व्यक्त केला.

कीअर स्टार्मर यांनी राजांकडे औपचारिकरित्या आपला राजीनामा सादर केल्यानंतर, राजा चार्ल्स तृतीय यांनी अँडी बर्नहॅम यांना नवे सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रित केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande