सिक्कीममध्ये बांधकाम सुरू असलेल्या बोगद्यातील दुर्घटनेत आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू
गंगटोक, 21 जुलै (हिं.स.) सिक्कीममधील नामची जिल्ह्यातील झोलुंगे येथील समरडोंगमध्ये नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड (एनएचपीसी) च्या तीस्ता स्टेज-६ जलविद्युत प्रकल्पाचे बांधकाम सुरू असून, बोगद्यात अडकलेल्या कामगारांच्या सुटकेसाठी शोध आ
सिक्कीममध्ये बांधकाम सुरू असलेल्या बोगद्यात दुर्घटना


सिक्कीममध्ये बांधकाम सुरू असलेल्या बोगद्यात दुर्घटना


गंगटोक, 21 जुलै (हिं.स.) सिक्कीममधील नामची जिल्ह्यातील झोलुंगे येथील समरडोंगमध्ये नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड (एनएचपीसी) च्या तीस्ता स्टेज-६ जलविद्युत प्रकल्पाचे बांधकाम सुरू असून, बोगद्यात अडकलेल्या कामगारांच्या सुटकेसाठी शोध आणि बचाव कार्य सुरू आहे. हे बचावकार्य रात्रभर सुरू होते. या दुर्घटनेत आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. बोगद्यात अजूनही काही लोक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

सोमवारी दुपारी, बोगद्यात काम करणाऱ्या कामगारांना स्फोटासारखा मोठा आवाज ऐकू आला. गॅस गळतीचा संशय होता. त्यानंतर कामगार जीव वाचवण्यासाठी बोगद्यातून बाहेर पळू लागले. काही कामगार सुखरूप बाहेर पडण्यात यशस्वी झाले, तर इतर अनेक जण आत अडकले. माहिती मिळताच तात्काळ मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले. सुरुवातीच्या प्रयत्नांना गॅस गळती, बोगद्यातील प्रतिकूल परिस्थिती आणि आवश्यक बचाव साधनांच्या अभावामुळे अडथळा येत होता. यानंतर, पाकयोंग आणि सिलीगुडी येथील राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एनडीआरएफ) तुकड्या तैनात करण्यात आल्या, ज्यामुळे बचाव कार्याला गती मिळाली.

मंगळवारी पहाटे ४:४० वाजता मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, जिल्हा प्रशासनाने सात जणांच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. मृतांचे मृतदेह सिंगताम जिल्हा रुग्णालय, एसटीएनएम रुग्णालय, गंगटोक आणि नामची जिल्हा रुग्णालयात ठेवण्यात आले आहेत. मृतांची ओळख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.

नामची जिल्हा प्रशासन, एनएचपीसी अधिकारी, राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एसडीआरएफ), एनडीआरएफ, सिक्कीम पोलीस, अग्निशमन आणि आपत्कालीन सेवा, आरोग्य विभाग आणि इतर संबंधित विभागांच्या समन्वयाने मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. सिक्कीम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (एसएसडीएमए) परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande