भारतीय शेअर बाजारात सलग चौथ्या दिवशी घसरण
सेन्सेक्स 363 अंकांनी तर निफ्टी 126 अंकांनी घसरला नवी दिल्ली, 23 जुलै: भारतीय शेअर बाजारात सलग चौथ्या दिवशी घसरण पाहायला मिळाली. बुधवारी बेंचमार्क निर्देशांक दबावाखाली बंद झाले. निफ्टी 23,900 च्या खाली घसरला, तर सेन्सेक्समध्ये 363 अंकांची घसरण नों
शेअर बाजार


सेन्सेक्स 363 अंकांनी तर निफ्टी 126 अंकांनी घसरला

नवी दिल्ली, 23 जुलै: भारतीय शेअर बाजारात सलग चौथ्या दिवशी घसरण पाहायला मिळाली. बुधवारी बेंचमार्क निर्देशांक दबावाखाली बंद झाले. निफ्टी 23,900 च्या खाली घसरला, तर सेन्सेक्समध्ये 363 अंकांची घसरण नोंदवण्यात आली.

व्यवहाराच्या अखेरीस सेन्सेक्स 363.66 अंकांनी (0.47 टक्के) घसरून 76,391.39 अंकांवर बंद झाला, तर निफ्टी 126.65 अंकांनी (0.53 टक्के) खाली येत 23,869.60 अंकांवर स्थिरावला.

आज बीएसईवर एकूण 4,391 शेअर्समध्ये व्यवहार झाला. यापैकी 1,641 शेअर्समध्ये वाढ झाली, 2,579 शेअर्स घसरले, तर 171 शेअर्समध्ये कोणताही बदल झाला नाही.

रिअल्टी आणि ऑइल-गॅस क्षेत्रात मोठी घसरणआजच्या बाजारातील घसरणीत रिअल्टी, ऑइल अँड गॅस आणि इतर प्रमुख क्षेत्रांचा मोठा वाटा राहिला. निफ्टी मेटलमध्ये 0.7 टक्के, निफ्टी फार्मामध्ये 0.4 टक्के, निफ्टी एफएमसीजीमध्ये 0.4 टक्के आणि निफ्टी कंझ्युमर ड्युरेबल्समध्ये 0.4 टक्क्यांची घसरण झाली.

मात्र, निफ्टी ऑटो निर्देशांकाने चांगली कामगिरी करत 0.7 टक्क्यांची वाढ नोंदवली, तर निफ्टी मीडिया निर्देशांकात 0.22 टक्क्यांची तेजी दिसून आली. निफ्टी मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकांमध्ये प्रत्येकी 1 टक्क्यांची घसरण झाली.

अदाणी एंटरप्रायझेससह अनेक मोठे शेअर्स घसरले

निफ्टीमध्ये सर्वाधिक घसरण झालेल्या शेअर्समध्ये अदाणी एंटरप्रायझेस, श्रीराम फायनान्स, नेस्ले इंडिया, अदाणी पोर्ट्स आणि बजाज फायनान्स यांचा समावेश होता.

तर वाढ नोंदवणाऱ्या प्रमुख शेअर्समध्ये बजाज ऑटो, एसबीआय लाइफ इन्शुरन्स, महिंद्रा अँड महिंद्रा (M&M), टीसीएस आणि आयशर मोटर्स यांचा समावेश होता.

एकूणच, जागतिक संकेत आणि प्रमुख क्षेत्रांतील विक्रीमुळे भारतीय शेअर बाजारावर दबाव कायम राहिला.---------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande