
* लाखो भारतीयांसाठी टेड रेमिटन्स आणि कौटुंबिक परदेशी रकमेचे रेमिटन्स अधिक सुलभ
* व्यापारासाठी आणि परवानगी असलेल्या चालू खात्यांतील परदेशी रकमेच्या रेमिटन्ससाठी नव्या संधी उपलब्ध
मुंबई, 24 जुलै (हिं.स.) - EbixCash वर्ल्ड मनी लिमिटेड आज आरबीआयकडून कायमस्वरूपी परवाना मिळवणारी भारतातील पहिली अधिकृत डीलर श्रेणी-2 (AD-II) कंपनी ठरली आहे. हा एक महत्त्वपूर्ण नियामक टप्पा असून, देशातील इतर कोणत्याही AD-II संस्थेला अद्याप अशी मान्यता मिळालेली नाही. मे 2026 मध्ये परकीय चलन व्यवस्थापन कायदा (फेमा) अंतर्गत करण्यात आलेल्या ऐतिहासिक सुधारणा नंतर हा परवाना प्रदान करण्यात आला. या सुधारणांद्वारे भारतीय रिझर्व्ह बँकेने प्रथमच AD-II संस्थांना रु 25 लाखांपर्यंतच्या ट्रेड रेमिटन्सची तसेच कुटुंबाच्या देखभाल व उदरनिर्वाहासाठी परदेशात रक्कम पाठविण्याची सेवा देण्याची परवानगी दिली आहे.
आजपर्यंत व्यापाराशी संबंधित परदेशी रकमेचे रेमिटन्स हे केवळ बँका आणि अधिकृत डीलर श्रेणी-I (AD-I) संस्थांपुरते मर्यादित होते. त्यामुळे हा बदल परकीय चलन व्यवहारांच्या क्षेत्रातील एक मूलभूत आणि ऐतिहासिक संरचनात्मक बदल मानला जात आहे. EbixCash वर्ल्ड मनी, जे आधीपासूनच भारतातील सर्वात मोठे AD-II नेटवर्क आहे, आता आपल्या श्रेणीतील व्यापाराशी संबंधित परदेशी रकमेचे व्यवहार करण्यास अधिकृत ठरलेली पहिली नॉन बँक संस्था बनली आहे. यामुळे बँकिंग सेवांपर्यंत मर्यादित पोहोच असलेल्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (एमएसएमई) तसेच लघु उद्योग (एसएमई) यांच्यापर्यंत ही सेवा थेट पोहोचेल.
भारतीय एमएसएमई निर्यातदार आणि आयातदारांना बऱ्याच काळापासून एका मोठ्या अडथळ्याचा सामना करावा लागत होता: परदेशात वस्तू आणि सेवांसाठी पैसे पाठवण्यासाठी किंवा स्वीकारण्यासाठी संपूर्ण बँकिंग सुविधेची आवश्यकता होती, ज्यासाठी अनेकदा वेळ लागायचा आणि खूप कागदपत्रांची गरज असायची. EbixCash वर्ल्ड मनीमध्ये केलेल्या सुधारणेमुळे हा अडथळा दूर झाला आहे. कंपनीला कायमस्वरूपी परवाना मिळाला आहे. ज्यासाठी वारंवार नूतनीकरणाची आवश्यकता नाही. आता तिची व्याप्ती ट्रेड रेमिटन्स आणि घरगुती खर्चापर्यंत विस्तारली आहे. यामुळे ही कंपनी भारतातील एमएसएमईंसाठी सीमापार पेमेंटचे सर्वात जलद आणि सर्वात सुलभ माध्यम बनण्याच्या स्थितीत आहे.
यावर भाष्य करताना, EbixCash वर्ल्ड मनी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, टी. सी. गुरुप्रसाद म्हणाले: जवळपास तीन दशकांपासून नियामकासोबत विश्वास निर्माण करण्यासाठी घेतलेल्या आमच्या कठोर परिश्रमाचे फळ आज मिळाले आहे. भारतातील पहिली AD-II संस्था म्हणून हा परवाना मिळणे ही आमच्यासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे. आम्ही या सन्मानाकडे केवळ परवाना म्हणून पाहत नाही; तर 1999 पासून कॉर्पोरेट गव्हर्नन्स, नियामक नियमांचे पालन आणि ग्राहक संरक्षण या क्षेत्रांत उभारलेल्या भक्कम पायाभरणीवर RBI ने व्यक्त केलेला विश्वास म्हणून त्याकडे पाहतो. आमची दृष्टी या परवान्यापुरती मर्यादित नाही. EbixCash वर्ल्ड मनी आज भारतातील सर्वाधिक विश्वासार्ह आणि सर्वसमावेशक पेमेंट्स व परकीय चलन प्लॅटफॉर्मपैकी एक म्हणून ओळखली जाते. आमच्या तंत्रज्ञानाधारित इकोसिस्टम मध्ये पेमेंट्स, रेमिटन्स, ट्रॅव्हल कार्ड्स आणि ट्रेझरी सेवा एका इंटिग्रेटेड प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहेत. ही दूरदृष्टी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या पेमेंट विजन 2028 तसेच सीमापार पेमेंट अधिक सक्षम करण्यासाठीच्या G20 रोडमॅप या उपक्रमांच्या उद्दिष्टांशी सुसंगत आहे. भारताच्या डिजिटल पेमेंट्सच्या प्रवासात आम्हाला केवळ सहभागी व्हायचे नाही, तर त्या प्रवासाला दिशा देणाऱ्या संस्थांपैकी एक बनण्याचा आमचा निर्धार आहे.
या विस्तारित कार्यक्षेत्रामुळे भारतातील सीमापार पेमेंट सिस्टीममध्ये EbixCash वर्ल्ड मनीचे स्थान अधिक मजबूत होते, ज्यामुळे कंपनीला विविध प्रकारच्या परकीय चलन आणि रेमिटन्स सेवांद्वारे व्यवसाय आणि व्यक्तींना सेवा देणे शक्य होते. भारतातील टेड आणि डिजिटल पेमेंटचा विस्तार होत असताना, कंपनी आपल्या देशव्यापी नेटवर्क आणि तंत्रज्ञान-आधारित प्लॅटफॉर्मचा उपयोग करून लाखो ग्राहकांसाठी आंतरराष्ट्रीय पेमेंट जलद, सोपे आणि नियामक-अनुरूप बनवण्याचे ध्येय बाळगते.
आरबीआयच्या सुधारित FEMA फ्रेमअंतर्गत, EbixCash वर्ल्ड मनी आता रु 25 लाखांपर्यंतच्या व्यापाराशी संबंधित पेमेंटचे तसेच कुटुंबाच्या देखभाल-निर्वाहासाठी परदेशात रक्कम पाठविण्याचे सुविधा प्रदान करू शकते. यामुळे भारतातील MSME क्षेत्रासाठी बँकेवर अवलंबून नसलेला, थेट आणि सुलभ आंतरराष्ट्रीय पेमेंटचा मार्ग उपलब्ध झाला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी